राहुल द्रविडचा धक्कादायक निर्णय! राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदाचा तडकाफडकी राजीनामा

नवी दिल्ली: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू, माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. राहुलच्या राजीनाम्या संदर्भातील माहिती संघ व्यवस्थापनाने दिली आहे. खरं तर प्रमुख खेळाडू संजू सॅमसन हा या हंगामात राजस्थान संघाकडून खेळणार नाही, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात होती. ही चर्चा सुरू असतानाच, राहुल द्रविडनने राजीनामा दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


टीम इंडियाला आपल्या मार्गदर्शनाखाली टी-२०  वर्ल्ड कप जिंकून देणारे राहुल द्रविड यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयाची माहिती स्वतः राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीनं सोशल मीडियावर दिली.


राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनानं ही अधिकृत माहिती दिली आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आयपीएल २०२६  (IPL 2026) च्या पर्वाला सुरुवात होण्याआधीच आपला कार्यकाळ संपुष्टात आणणार आहे.



राजीनाम्याचं कारण काय?


आयपीएल २०२५ मध्येच राजस्थान रॉयल्सच्या संघात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा होती. कर्णधार संजू सॅमसन हा संघ व्यवस्थापनावर नाराज होता. पण नंतर राहुल द्रविडनंच ते वृत्त फेटाळलं होतं. कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचं द्रविडनं त्यावेळी स्पष्ट केले होते.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात