जरांगेंच्या आंदोलनाला तिसऱ्या दिवशीही मिळाली परवानगी!

मुंबई: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत लाखोंचा जनसमुदाय घेऊन आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता.  दिनांक २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी जरांगे यांना आंदोलन करण्यास परवानगी दिली होती. त्यांनंतर आज एका दिवसासाठी ही मुदत वाढवून दिली होती. जी संध्याकाळी ६ वाजता संपली आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणखी एका दिवसाची परवानगी दिली असल्याकारणामुळे तिसऱ्या दिवशीही मुंबईत जरांगे समर्थकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळणार आहे.


मनोज जरांगे पाटील यांनी जोवर मराठा समाजाच्या मागण्या सरकार मान्य करत नाही, तोवर मुंबई सोडणार नसल्याचा एल्गार केला आहे. त्यामुळे आंदोलनाला परवानगी मिळो वा ना मिळो जरांगे जागेवरून हटणार नसल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, या आंदोलनामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर आणि प्रशासनावर प्रचंड ताण पडला आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकरणावर लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार करत आहे. त्यामुळे आज किंवा उद्या सरकारचे काही प्रतिनिधी जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याची माहितीही समोर आली आहे.



शिंदे समिती आणि जरांगेची भेटीत काय ठरले?  


कुणबी नोंदी शोधण्यासाठी निवृत्ती न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. आज निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी शिंदे समितीने मागण्यांची अंमलबजावणीसाठी काही वेळ मागितला. मात्र जरांगे पाटलांनी हैदराबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक मिनिटही वेळ देणार नाही असं विधान केलं आहे.


दरम्यान, शिंदे समितीने मनोज जरांगेकडे वेळ मागितला.  मात्र जरांगे यांनी कोणताही प्रकारचा वेळ देण्यास थेट नकार दिला आहे. ते म्हणाले,  शनिवार-रविवारच्या आत काही झालं नाही तर हे आंदोलन कायम राहील.



सदावर्तेकडून जरांगेना अटक करण्याची मागणी


गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांनी अटक करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, कायद्यासमोर जरांगेला मोठं समजू नये. आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जरांगे ऐकला नाही तर चुकीची प्रथा पडेल. नियम मोडले जातील. यामुळे आगामी काळातील आंदोलनांमध्येही नियम मोडण्याची प्रथा पडेल. हे कायद्याचं राज्य आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणातात यापेक्षा कायदा काय म्हणतो हे पाहून, वरिष्ठ पोलिस निरिक्षण आझाद मैदान यांनी सहा वाजल्यानंतर जरांगेला अटक करून, माननीय मॅजिस्टेट यांच्यासमोर उभे करा. कारण कायद्याची पायमल्ली महाराष्टाला परवडणारी नाहीये.

Comments
Add Comment

ड्रोन दिसताच बोंबाबोंब करणारी शिउबाठा अखेर तोंडावर पडली

मुंबई : शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर परिसराजवळ ड्रोन उडत असल्याचे आढळले. या

Aapli Chikitsa योजनेत विश्वासघात,तरीही महापालिकेने दाखवला विश्वास

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर केला जाणारा खर्च कमी व्हावा आणि रुग्णांना

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रावळी कॅम्प प्रसूतीगृह वगळता सर्व प्रसूतीगृहांमध्ये विद्युत पुरवठा

एसआरए इमारतींना आपत्कालीन जिना उभारणार

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत उभारलेल्या मुंबईतील तब्बल एक हजार सात मजली जुन्या इमारतींना आता बाहेरील

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू