Accident : बीडमध्ये भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

बीड: बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघातातील सर्व लोक पेंडगाव येथे दर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, मात्र त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना चिरडले. धडक इतकी जोरदार होती की, चार जणांचा जागीच मृत्यू झाला.


या अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर, गढी उड्डाणपुलाजवळ अशाच प्रकारच्या अपघातात पाच ते सहा लोकांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

किंग्ज सर्कल, वडाळा, कुर्ला वासियांची तुंबणाऱ्या पाण्याची समस्या काही दिवसांचीच

अखेर माहुल पंपिंग स्टेशनसाठीची जमिन हस्तांतरीत मिठागराची जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका मोजणार साडेतेरा

Dharmendra Passes Away : कोहिनूर हरपला! धर्मेंद्र यांची मृत्यूशी झुंज अपयशी, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ आणि लोकप्रिय सुपरस्टार, 'ही-मॅन' (He-Man) म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे आज

गुणपत्रिका न मिळाल्याने करिअर कोलमडले; उच्च न्यायालयाचे शिक्षण मंडळाला फटकारे

मुंबई : महाविद्यालय आणि राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय चुकीमुळे एका विद्यार्थ्याला

म्हाडाच्या वसाहतीतील एकल इमारतींच्या पुनर्विकासाला यापुढे परवानगी नाही

मुंबई : राज्य शासनाने म्हाडाच्या अभिन्यासात एकत्रित पुनर्विकासास पात्र असलेल्या परिसरात यापुढे एकल इमारतीच्या

मुंबईच्या मतदारयादीत ११ लाख दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बेस्ट भरती करणार ५०० वाहक

मुंबई : दिवसेंदिवस कमी होत चाललेली कर्मचाऱ्यांची संख्या व सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर येणारा अतिरिक्त ताण