रोहित शर्मासह ६ क्रिकेटपटूंची सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणी होणार

बंगळुरु : रोहित शर्मा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे बंगळुरू येथील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे फिटनेस चाचणी देणार आहेत. भारतीय क्रिकेटचा नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी क्रिकेटपटूंची चाचणी करण्यासाठी वापरला जाणारा डीईएक्सए स्कॅन केला जाणार आहे. याशिवाय काही रक्त चाचण्या देखिल केल्या जातील.


विराट कोहलीबद्दल अद्याप स्पष्टता नाही. सर्व क्रिकेटपटूंना प्री-सीझन फिटनेस चाचण्या कराव्या लागतील. करारानुसार हे अनिवार्य आहे. या चाचण्यांमुळे सीओईला क्रिकेटपटूंना कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे किंवा त्यांची कमतरता कुठे आहे हे समजण्यास मदत होते. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ब्रेक होता. त्यामुळे क्रिकेटपटू घरीच व्यायाम करत होते.


रोहित आणि कोहलीच्या भविष्याबद्दल अनेक शक्याशक्यता वर्तवल्या जात आहेत. दोघांनीही टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटला निरोप दिला आहे. आणि आता त्यांच्या एकदिवसीय भविष्याबद्दलच्या चर्चाही जोरात सुरू झाल्या आहेत. कारण एकदिवसीय स्वरूपातील मोठी स्पर्धा २०२७ चा विश्वचषक आहे. ज्यासाठी अजूनही वेळ आहे. दरम्यान, बीसीसीआयने फिटनेसबाबत मोठा बदल केला आहे आणि आता ब्रोंको चाचणी वेगवान गोलंदाजांसाठी अनिवार्य फिटनेस मापदंड बनला आहे. भारतीय संघाचे कंडिशनिंग प्रशिक्षक एड्रियन ले रॉक्स यांच्या सूचनेनुसार ही चाचणी घेण्यात येणार आहे.


ब्रोंको ही चाचणी रग्बीमधून घेण्यात आली आहे. आणि क्रिकेटपटूंच्या एरोबिक क्षमता आणि धावण्याच्या सहनशक्तीची चाचणी घेण्यासाठी डिझाइन केलेली आहे. यामध्ये, खेळाडूला एका सेटमध्ये २० मीटर, ४० मीटर आणि ६० मीटरची शटल रन पूर्ण करावी लागते. एकूण पाच सेट म्हणजेच १२०० मीटर अंतर सतत पूर्ण करावे लागतात म्हणजेच न थांबता आणि यासाठी जास्तीत जास्त वेळ सहा मिनिटे निश्चित करण्यात आली आहे. ही चाचणी आधीच अस्तित्वात असलेल्या यो-यो चाचणी आणि दोन किलोमीटर टाइम-ट्रायलच्या संयोगाने क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन करणार आहे.

Comments
Add Comment

IPL 2026: लखनौचा कमबॅक, KKR अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

मुंबई : आयपीएल २०२६ मधील रंगतदार सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 3 विकेटने या सामन्याला रंग

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स