औद्योगिक उत्पादनाचा वेग जुलै महिन्यातही वाढला !

नवी दिल्ली:उत्पादन क्षेत्राच्या (Manufacturing Sector) चांगल्या कामगिरीमुळे या वर्षी जुलैमध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग ३.५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, असे गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत सांख्यिकी विभागाच्या अधिकृत आकडेवारीत म्हटले गेले आहे. या वाढीवर भाष्य करताना 'उत्पादन क्षेत्रातील ५.४% वाढीमुळे, औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) ने जुलै २०२५ मध्ये वार्षिक ३.५% वाढ नोंदवली आहे 'असे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.


आयआयएफ मध्ये माफक सुधारणा नोंदवली -


मार्च २०२५ मध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादनात (Indias Indudstrial Production IIP) याआधी ३.९ टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) च्या संदर्भात मोजले जाणारे यापूर्वी औद्योगिक उत्पादन जुलै २०२४ मध्ये ५% वाढ ले होते. यावेळी वेग मंदावला असला तरी भूराजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही वाढ समाधानकारक मानली जाऊ शकते.


क्षेत्रनिहाय कामगिरी


राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या तात्पुरत्या अंदाजाच्या तुलनेत जूनमध्ये औद्योगिक उत्पादन वाढ १.५ वर अपरिवर्तित (Unchanged) ठेवली होती.


आतापर्यंतची वाढ -


जुलै २०२५ मध्ये वीज उत्पादनात (Energy Production) ०.६ % वाढ झाली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत ७.९ टक्के होती. आर्थिक वर्ष २६ च्या एप्रिल-जुलै या कालावधीत, देशाचे एकूण औद्योगिक उत्पादन २.३% वाढले, जे गेल्या वर्षी ५.४% वा ढले होते. खाण उत्पादनात गेल्या वर्षीच्या ३.८% वाढीच्या तुलनेत ७.२% घट झाली. जुलै २०२५ मध्ये वीज उत्पादनात केवळ ०.६% वाढ झाली. जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ७.९ टक्क्यांनी वाढली होती.आर्थिक वर्ष २६ च्या एप्रिल-जुलै या कालावधीत, देशाचे एकूण औद्योगिक उत्पादन गेल्या वर्षीच्या ५.४% तुलनेत २.३% वाढले आहे.उत्पादन क्षेत्रात, एनआयसी २ अंकी स्तरावरील २३ पैकी १४ उद्योग गटांनी जुलै २०२४ च्या तुलनेत जुलै २०२५ मध्ये सकारात्मक वाढ नोंदवली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, जुलै २०२५ महिन्यातील तीन सकारात्मक घटक म्हणजे 'मूलभूत धातूंचे उत्पादन' १२.७%,विद्युत उपकरणांचे उत्पादन' (Energy Equipment) १५.९% आणि 'इतर धातू नसलेल्या खनिज उत्पादनांचे उत्पादन' (Non Metal Mineral Productrion) ९.५% आहे.


'मूलभूत धातूंचे उत्पादन' या उद्योग गटात, 'एमएस स्लॅब', 'एचआर कॉइल्स आणि सौम्य स्टीलच्या शीट्स' आणि 'अ‍ॅलॉय स्टीलची फ्लॅट उत्पादने' या आयटम गटांनी वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दर्शविले आहे, असेही सांख्यिकी विभागाच्या अभ्यासात म्हटले आहे. 'विद्युत उपकरणांचे उत्पादन' या उद्योग गटात, 'इलेक्ट्रिक हीटर्स', 'इलेक्ट्रिकल सर्किट्स स्विच करण्यासाठी किंवा संरक्षित करण्यासाठी विद्युत उपकरणे (उदा. स्विचगियर, सर्किट ब्रेकर/स्विच, कंट्रोल/मीटर पॅनेल)' आणि 'ट्रान्सफॉर्मर्स (स्मॉल)' या ग टांनी वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दर्शविले आहे, असे मंत्रालयाने पुढे स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिका निवडणूक, महायुतीचं ठरलं; भाजप १३७ आणि शिवसेना ९० जागा लढणार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र अखेर ठरले आहे. भाजप आणि शिवसेनेत

भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने १३ जणांना चिरडले

मुंबई : भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने रात्री दहाच्या सुमारास १३ जणांना चिरडले. या अपघातात तीन महिला आणि एक

मुंबई महापालिका निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात २७ उमेदवारांचा

मुंबई महापालिका निवडणूक; अर्ज विक्री साडेअकरा हजारांची, भरले गेले फक्त ४०१

शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर न झाल्याने अर्ज भरणाऱ्याचे घटले प्रमाण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईतील शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसचे अस्तित्व संपले

राखी जाधव भाजपात तर मनिषा रहाटे, पिसाळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई (विशेष प्रतिनिधी)

एकाच कुटुबांत दोघांना उमेदवारीची लॉटरी

विविध राजकीय पक्षांची एकाच कुटुंबावर मेहेरबानी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी