सावर्डे : मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठ बस स्थानक परिसरात खासगी बसचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस महामार्गावरील विजेचे खांब तोडून बाजारातील एका दुकानात घुसली. अपघात पहाटे सव्वाचारच्या सुमारास झाला. पहाटेच्या वेळी मार्गावरील वाहतूक आणि बाजारपेठेतील दुकानं बंद असल्यामुळे रहदारी कमी होती. यामुळे या अपघातात जीवितहानी झाली नाही. पण बसचे नुकसान झाले तसेच बस ज्या दुकानात घुसली त्या दुकानाच्या मालकाचे आर्थिक नुकसान झाले.