Bihar Election : मोदींवर अपशब्दांचा वर्षाव अन् शाहांचा इशारा..."जितक्या शिव्या द्याल, तितकं कमळ बहरणार!"

बिहार : बिहारमध्ये या वर्षाअखेर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्यांनाही चांगलाच वेग आला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी हे मतदार हक्क यात्रा घेऊन बिहार दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सभांमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या दौऱ्यादरम्यान मोठा वाद उद्भवला. काँग्रेसच्या मंचावरून बोलताना युथ काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या आईवरून शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून भाजपने यावरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. “काँग्रेसला जनतेच्या प्रश्नांना उत्तर देता येत नाही म्हणून वैयक्तिक पातळीवर अशा घाणेरड्या शब्दांचा वापर केला जातो. ही मानसिकता बिहारच्या जनतेला नक्कीच मान्य होणार नाही,” अशी टीका अमित शाह यांनी केली आहे. यामुळे बिहारमधील निवडणूक रंगत अधिकच वाढली असून पुढील काही दिवसांत हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



गुवाहाटीत अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल


आसामची राजधानी गुवाहाटी येथे आयोजित सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आंतरराष्ट्रीय मान्यतेचा उल्लेख करत, “आजपर्यंत २७ देशांनी नरेंद्र मोदींना सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. असा नेता ज्याचा संपूर्ण जग आदर करतो, तो भारताचा पंतप्रधान आहे,” असे सांगितले. मात्र, त्याचवेळी अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला. “भारतीय राजकारणात द्वेष आणि तिरस्काराचे नकारात्मक राजकारण सुरू करण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. बिहारमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या ‘घुसखोर बचाओ यात्रेतून’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवंगत मातेसाठी अपशब्द वापरण्यात आले. हे काँग्रेस नेत्यांचे सर्वात घृणास्पद कृत्य आहे,” असे शाह म्हणाले. शाह यांनी यावेळी स्पष्ट इशारा दिला की, बिहारच्या जनतेसमोर काँग्रेसची खरी मानसिकता उघड होत आहे. “जनतेला या प्रकारचे निकृष्ट आणि वैयक्तिक टीकेवर आधारित राजकारण कधीच मान्य होणार नाही. लोक फक्त विकासाच्या आणि सुरक्षेच्या राजकारणावर विश्वास ठेवतात,” असेही ते म्हणाले. या वक्तव्यामुळे बिहार निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापले असून भाजप आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष चुरशीचा झाला आहे.





“द्वेषाचे राजकारण देशाला खालच्या पातळीवर नेईल”


शाह म्हणाले, “राहुल गांधी यांनी आपल्या भाषणांमधून द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातेबद्दल वापरलेले अपशब्द हा केवळ राजकीय अपमान नाही तर भारतीय संस्कृतीचा ही अवमान आहे.” शाह यांनी यावेळी या वक्तव्याचा तीव्र निषेध करत सांगितले की, “मी संपूर्ण देशातील जनतेला सांगू इच्छितो, की राहुल गांधी यांनी सुरू केलेले हे निरर्थक, नकारात्मक आणि द्वेषपूर्ण राजकारण सार्वजनिक जीवन उंचावणार नाही. उलटपक्षी ते समाजात फूट आणि राजकारणात घसरण घडवून आणेल.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, काँग्रेस नेत्यांनी देशाच्या प्रगतीपेक्षा वैयक्तिक टीका आणि द्वेष याला प्राधान्य दिले आहे. “भारतीय जनता अशा प्रकारच्या राजकारणाला कधीही मान्यता देणार नाही. देश विकासाच्या मार्गावर चालतो आहे आणि जनतेला हवे तेच म्हणजे प्रगती आणि स्थैर्य, न की द्वेष आणि तिरस्कार,” असेही शाह म्हणाले.



“काँग्रेस नेत्यांच्या अपशब्दांमुळे भाजपचं कमळ अधिक बहरणार”


काँग्रेसचे नेते गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अपशब्दांचा वर्षाव करत आहेत. “हे द्वेषाचे राजकारण आजचे नाही. मोदीजी सत्तेत आल्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी, दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर, जयराम रमेश, रेणुका चौधरी जवळपास प्रत्येक काँग्रेस नेत्याने त्यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य केले आहे,” असे शाह म्हणाले. त्यांनी पुढे उदाहरणे देत सांगितले की, काहींनी मोदींना ‘मृत्यूचा व्यापारी’ म्हटलं, काहींनी ‘विषारी साप’ तर काहींनी ‘नीच’, ‘रावण’, ‘भस्मासुर’ आणि ‘विषाणू’ अशी शब्दावली वापरली. “काँग्रेस नेत्यांना खरंच असं वाटतं का की, अशा अपमानास्पद भाषेमुळे तुम्हाला जनादेश मिळेल?” असा सवाल शाह यांनी उपस्थित केला. शाह म्हणाले की, “मी आज काँग्रेसला सांगू इच्छितो – भाजपला जितक्या शिव्या द्याल, तितकंच कमळ अधिक जोमाने उमलून आकाशाला भिडेल. कारण जनतेला विकास, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रहित हवं आहे, शिवीगाळ आणि नकारात्मक राजकारण नव्हे,” असा ठाम इशाराही त्यांनी यावेळी दिला.


Comments
Add Comment

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या