Gold Silver Rate: आज सणासुदीला सोन्यात तुफान वाढ चांदीत मात्र घसरण ! जाणून घ्या आजचे दर

मोहित सोमण: सलग चौथ्यांदा सोने उसळले आहे. सोन्याच्या दरात ही मोठी वाढ जागतिक भूराजकीय परिस्थितीमुळे झाली आहे. प्रामुख्याने टॅरिफ दबावासह युएस ट्रेझरीत झालेली घसरण, डॉलरच्या निर्देशांकात झालेली घसरण, वाढलेली गोल्ड स्पॉट मागणी या एकत्रित कारणांमुळे वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ७१ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ६५ रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५३ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १०३३१, २२ कॅरेटसाठी ९४७० रूपये, १८ कॅरेटसाठी ७७४८ रूपयांवर पोहोचला आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ७१० रूपयांची, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ६५० रूपयां ची, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ५३० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १०३३१०, २२ कॅरेटसाठी ९४७००,१८ कॅरेटसाठी ७७४८० रूपयांवर पोहोचले आहेत.


आज संध्याकाळपर्यंत जागतिक सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.१६% घसरण झाली आहे. तर जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट प्रति डॉलर दर ०.२६% घसरून ३४११ औंसवर गेला आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहराती ल २४ कॅरेट सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर १०३३१ रूपये, २२ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ९४७० रूपये, १८ कॅरेटसाठी ७८३० रूपयांवर पोहोचले आहेत. सणासुदीच्या काळात सुरक्षित गुंतवणूकीसाठी वाढती मागणी, खरेदीत वाढ या कारणामुळे भारतीय सराफा बाजारातील दरात आज वाढ झाली. जरी अमेरिकन डॉलर दोन्ही दिशेने जात आहे आणि व्याजदर अंदाज चढ-उतार होत आहेत, तरीही देशांतर्गत आणि जागतिक अर्थव्यवस्थांवरील चिंता असूनही सोन्याची किंमत अजूनही त्यातुलनेत स्थिर आहे. भारतीय कमोडि टी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात ०.६१% वाढ झाली आहे. त्यामुळे एमसीएक्समधील दरपातळी १०२७२० रूपयांवर गेली आहे.


आजच्या सोन्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना सोन्याची किंमत तुलनेने स्थिर आहे, परंतु या धातूला अजूनही चांगली मागणी आहे. अल्पकालीन किंमतीच्या हालचालीत काही अस्थिरता आहे, जी उत्तर आणि दक्षिण दिशेने अमेरिकन डॉलर आणि व्याजदरांच्या बदलत्या अपेक्षांमुळे नियंत्रित केली जाईल. गुंतवणूकदार आंतरराष्ट्रीय संकेतांवर, प्रामुख्याने फेडरल रिझर्व्हच्या भावनांवर, तसेच सुरक्षित-निवासस्थानांच्या खरेदीवर परिणाम करणाऱ्या वाढत्या भू-राजकीय तणावांवर लक्ष ठेवत राहतील. या सणासुदीच्या काळात, भारतातील हंगामी खरेदी आणि लग्नाशी संबंधित मागणी घसरणीला आळा घालेल. म्हणूनच तर आंतरराष्ट्रीय प्रतिकूल परिस्थितींमध्ये, देशांतर्गत खरेदी क्रियाकलापांसह जवळच्या काळात सोन्याचा व्यापार एका अरुंद पट्ट्यात (Narrow Band) होण्याची अपेक्षा आहे, असे मत इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि आस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर्सचे सीईओ मोहित कंबोज यांनी व्यक्त केले आहे.


चांदीत घसरण !


आज दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर चांदीत मोठी घसरण झाली आहे. दोन दिवस चांदीचे दर स्थिर राहिले होते. संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ०.१० रूपयांनी व प्रति किलो दरात १०० रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचे प्रति ग्रॅम दर ११९.९० रूपये, प्रति किलो दर ११९९०० रूपयांवर गेला आहे. संध्याकाळपर्यंत जागतिक सिल्वर फ्युचर निर्देशांकात ०.३४% घसरण झाली. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स बाजारात चांदीच्या निर्देशांकात ०.१७% वाढ झाली असून दरपातळी ११७ ३६८.०० रुपयांवर गेली आहे. भारतातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर १२९९, प्रति किलो दर १२९००० रूपयांवर पोहोचले आहेत. प्रामुख्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली असताना चांदीच्या स्पॉट बेटिंगमध्ये घसरण, औद्योगिक मागणीत घट या कारणामुळे घट झाली आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!

The Wealth Company कडून देशातील पहिले महिला संचलित चार NFO ONDC व्यासपीठावर लाँच ! Ethical Fund ची घोषणा

मोहित सोमण:एखाद्या महिलेच्या अध्यक्षतेखाली द वेल्थ कंपनी (The Wealth Company) या असेट व्यवस्थापन कंपनीने आपले चार नवे

राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत!

धनंजय मुंडे, तानाजी सावंत इन, नरहरी झिरवळ, भरत गोगावले आऊट? मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडणार

Gold Rate Today: दोन दिवसांच्या रेकॉर्डब्रेक वाढीनंतर सोन्यात घसरण काय दर घसरले सोन्यात पुढे काय? जाणून घ्या दरासहित सोन्याची जागतिक परिस्थिती एका क्लिकवर!

मोहित सोमण: दोन दिवसांच्या दणकून झालेल्या वाढीनंतर आज सोन्याच्या गाडीला ब्रेक लागला आहे. दोन दिवस सोन चांदी

Grow नंतर आता 'फोन पे' चा क्रमांक ! हजारो कोटीचा हा PhonePe आयपीओ बाजारात दाखल होणार !

प्रतिनिधी:ग्रो (Grow) कंपनीने आपल्या आयपीओ फायलिंगनंतर आता वॉलमार्टचा पाठिंबा असलेल्या फोन पे या बड्या फिनटेक

मुंबई पोलिसांची कमाल! जम्मूचा फरार आरोपी वांद्र्यातील लकी हॉटेलमध्ये सापडला

मुंबई: मुंबई गुन्हे शाखेने जम्मूमध्ये खून, दरोडा आणि खंडणीसाठी हवा असलेला एक फरार आरोपी रॉयल मनजीत सिंगला