मधुमेहग्रस्तांनी रात्री अजिबात करू नका या चुका !

मुंबई : मधुमेहग्रस्त रूग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैलीचे पालन करणे आवश्यक असते . यात काही चुकामूक झाली तर मधुमेह संबंधित अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे मधूमहीग्रस्तांच्या खाण्याच्या वेळांपासून, ते आहारात काय खातात आणि कीती प्रमाणात खातात याची माहिती असणे देखील अत्यंत गरजेचे आहे.


चला आज आपण, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या रात्रीच्या जेवणात कोणत्या चुका करून नये याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया .


मधूमेहीग्रस्त रुग्णांनी रात्रीच्या जेवणादरम्यान कोणत्या चुका करू नये?


मधुमेह असलेल्या रुग्णांकडून काही ठराविक चुका झाल्यास त्याचा परिणामी त्यांना विविध आरोग्य अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अशा त्रुटी व त्यांचे दुष्परिणाम समजून घेणे आणि त्यांना टाळणे अत्यंत आवश्यक आहे :


जास्त कार्बोहायड्रेट्स खाणे
रात्रीच्या जेवणात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त घेतल्यास रक्तातील साखर अचानक वाढू शकते. त्यामुळे कार्बोहायड्रेट्सचे सेवन मर्यादित ठेवणे गरजेचे आहे.


अति प्रमाणात जेवण करणे
जास्त जेवल्यास पचनावर ताण येतो व ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढते. त्यामुळे प्रमाणात आणि हलकं जेवण करणं आवश्यक आहे.


जास्त चरबीचे पदार्थ सेवन करणे
तळलेले, फास्ट फूडसारखे हाय-फॅट पदार्थ रात्री खाल्ल्यास शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता (insulin sensitivity) कमी होऊ शकते. याऐवजी ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्सयुक्त चांगल्या प्रकारच्या फॅट्सचा समावेश करावा.


फ्रूट ज्यूस व साखरयुक्त पेये पिणे
रस, कोल्डड्रिंक्स किंवा गोड पेये रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवतात. त्यामुळे याऐवजी साधं पाणी किंवा ग्रीन टी पिणं जास्त फायदेशीर आहे.


भाज्यांकडे दुर्लक्ष करणे
फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेल्या भाज्या रात्रीच्या आहारात समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे. त्या रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत करतात. गोड पदार्थ आणि जास्त सूप टाळलेलं चांगलं.


प्रथिनांचा अभाव
रात्रीच्या आहारात पुरेशी प्रथिने न मिळाल्यास शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवणं अवघड होतं. दूध, डाळी, कडधान्ये, अंडी किंवा मांसाहार यांचा समावेश फायदेशीर ठरतो.


उशिरा जेवण करणे
रात्री उशिरा जेवल्याने पचनक्रिया मंदावते आणि रक्तातील साखर असंतुलित पातळीवर जाते. त्यामुळे वेळेत आणि हलकं जेवण करणं गरजेचं आहे.


टीव्ही/मोबाईल वापरत जेवण करणे
जेवताना टीव्ही, संगणक किंवा मोबाईलमध्ये गुंतल्यामुळे किती खाल्ले जाते याकडे लक्ष राहत नाही. परिणामी, जास्त कॅलरीज शरीरात जातात आणि डायबिटीज नियंत्रण कठीण होते.


मद्यपान करणे
रात्री मद्य घेतल्यास रक्तातील साखर अचानक कमी होऊन हायपोग्लायसीमियाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी अल्कोहोल टाळलेलं उत्तम.


अस्वीकरण : वरील मजकूर केवळ माहितीपर हेतूसाठी सादर करण्यात आला आहे. प्रहार या माहितीची शाश्वती देत नाही किंवा तिचे समर्थन करत नाही. औषधोपचार, आहार नियोजन किंवा उपचार पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

Navratri 2025 : यंदा नवरात्र ९ दिवसांची नव्हे तर १० दिवसांची! जाणून घ्या खास कारण

दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गा देवीचे उपास करतात,

Ganeshotsav 2025 : लहानशा खोलीतलं मोठं मन! चाळीतल्या १०x१० खोलीतून २ बीएचके घरापर्यंतचा प्रवास!

जुन्या आठवणींना उजाळा देणारी अनोखी गणेश सजावट नायगाव बी.डी.डी. चाळ नंबर १७/१८, लहान चाळीच्या खोलीतून आजच्या

Ganeshotsav 2025 : महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकायचं! मराठी अस्मितेसाठी गणेशोत्सवात देखावा- १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण

मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि हक्कांची जाणीव करून देणारा एक विशेष देखावा परेल व्हिलेजमध्ये गणेशोत्सवात

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला ‘बाप्पा’ का म्हणतात? हा गोड शब्द आला तरी कुठून हे ९९% लोकांना ठाऊकच नाही, जाणून घ्या खरी गोष्ट

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया! अशा जयघोषांनी प्रत्येक घराघरात आणि रस्त्यावर वातावरण दुमदुमून जातं.