उत्तराखंडमध्ये ढगफुटी आणि मुसळधार पावसाचा कहर

डेहराडून : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. टिहरी जिल्ह्यातील गेंवाली भिलंगना येथे गुरुवारी रात्री ढगफुटीची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले ता आहे.


राजस्व विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. तसेच आरोग्य, वीज, जल संस्था, जल निगम, सार्वजनिक बांधकाम विभाग, वेपकोस व पशुवैद्यकीय पथकेही मदतीसाठी पाठवण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे कालेश्वर येथे डोंगरावरून आलेला मलबा थेट घरांमध्ये घुसला आहे. सध्या जेसीबीच्या साहाय्याने मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. पोलिस यंत्रणाही घटनास्थळी उपस्थित आहे. दरम्यान, चमोली जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी बंद झाला आहे. हे मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित पथके घटनास्थळी काम करत आहेत.


रुद्रप्रयाग जिल्ह्यात अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांच्या संगमावर पाण्याची पातळी सातत्यानं वाढत आहे. अलकनंदा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नदीचं पाणी आता घरांपर्यंत पोहोचले आहे, ज्यामुळे प्रशासनाने काही घरं तात्काळ रिकामी केली आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रुद्रप्रयागमधील प्रसिद्ध हनुमान मंदिरदेखील पाण्यात बुडाले आहे. तसेच केदारघाटीतील लवारा गावाजवळील मोटर पुल जोरदार प्रवाहात वाहून गेला आहे. छेनागाड भागातही परिस्थिती गंभीरच आहे.


उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ जिल्ह्यांमध्ये भूस्खलन आणि पाणी साचण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चमोली जिल्ह्यात भारत-चीन सीमेला जोडणारा मलारी राष्ट्रीय महामार्ग लाता गावाजवळ डोंगर कोसळल्यामुळे बंद झाला आहे. यामुळे डझनभर गावांचा संपर्क तहसील मुख्यालयाशी तुटला आहे. सद्यस्थितीत रस्ता पुन्हा सुरू करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हवामान खात्याने देहरादून, बागेश्वर, नैनीताल आणि पिथौरागड येथे जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. इतर भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आले आहे. पुढील 2 दिवस राज्यभरात वेगवेगळ्या भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे संपूर्ण उत्तराखंडला येलो अलर्टवर ठेवण्यात आले आहे.


Comments
Add Comment

देशात सर्वाधिक दैनंदिन वेतन ‘या’ राज्यात मिळते

भारतातील २०२५ मधील आर्थिक स्थिती पाहाता वेगवेगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील दैनंदिन वेतनात मोठी

वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी तिघांना अटक

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर जेवण्यासाठी बाहेर जात असताना बलात्कार करण्यात

चीनच्या सीमेसंदर्भात नेहमीच आम्ही दक्ष : लष्करप्रमुख अनिल चौहान

उत्तराखंडची सीमा जरी सध्या शांत असली, तरी चीनच्या सीमेसंदर्भात सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे", असे चीफ ऑफ डिफेन्स

ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट ४ नोव्हेंबरला होणार लाँच

मुंबई : ह्युंदाई मोटर इंडिया आपल्या लोकप्रिय एसयूव्ही व्हेन्यूचे दुसऱ्या पिढीचे मॉडेल ४ नोव्हेंबर रोजी भारतीय

घरूनच भरता येणार शाळेची फी ! केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नवीन घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यांना पारदर्शकता सुधारण्यासाठी आणि पालकांसाठी सोयी

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी