'राष्ट्रीय हितासाठी तीन मुलं जन्माला घाला'



नवी दिल्ली : राष्ट्रीय हितासाठी तीन मुलं जन्माला घाला. हम दो हमारे तीन, हे धोरण राष्ट्रीय हितासाठी अवलंबिले पाहिजे; असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. डॉक्टरांनी मला सांगितले आहे की, योग्य वयात लग्न केल्याने आणि तीन मुले झाल्याने पालक आणि मुले दोघेही निरोगी राहतात. तीन भावंड असलेल्या घरातील मुले अहंकार व्यवस्थापन देखील शिकतात आणि भविष्यात त्यांच्या कौटुंबिक जीवनात कोणताही अडथळा येत नाही. डॉक्टरांचे हे म्हणणे लक्षात घेता प्रत्येक भारतीय जोडप्याने राष्ट्राच्या हितासाठी तीन मुले जन्माला घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे; असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.



लोकसंख्या नियंत्रित राहावी आणि त्याच वेळी पुरेशी राहावी यासाठी, प्रत्येक कुटुंबात तीन मुले असली पाहिजेत परंतु त्यापेक्षा जास्त नसावीत. त्यांचे संगोपन योग्य प्रकारे व्हावे यासाठी हे आवश्यक आहे. ही गोष्ट प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे झाल्याच्या निमित्ताने दिल्लीत “संघाच्या प्रवासाची १०० वर्षे नवीन क्षितिज” या तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी, सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी लोकसंख्या धोरणाबद्दल भाष्य केले.


भाजप,आरएसएसमध्ये कुठलाही वाद अथवा मतभेद नाही


संघाचे फक्त भाजप सरकारशीच नाही तर सर्व सरकारांशी चांगले संबंध आहेत. आमच्यात मतभेद असू शकतात, पण आमच्यात कोणतेही वैर नाही. आम्हाला एकमेकांवर विश्वास आहे की, जे प्रयत्न करत आहेत ते पूर्ण क्षमतेने ते करत आहेत. अशी स्पष्टोक्ती सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या पूर्ततेनिमित्त, दिल्लीतील विज्ञान भवन येथे तीन दिवसांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गुरुवारी कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता, ज्यामध्ये प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, जरी आपण वेगळ्या रस्त्याने गेलो तरी आपल्याला वेगळे जावे लागत नाही, सर्वांना एकाच ठिकाणी जावे लागते. सरकारमध्ये संघ सर्व काही ठरवतो हे म्हणणे चुकीचे आहे. आपण सल्ला देऊ शकतो, पण निर्णय तेच घेतात. जर आपण निर्णय घेतला असता तर इतका वेळ लागला नसता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.


मोहन भागवत यांनी सांगितले की, 'आम्हाला काही काम करायचे आहे, परंतु खुर्चीवर बसलेली व्यक्ती १००% आपल्या बाजूने असली तरी त्याला काम करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. तो ते करू शकेल की नाही, हे त्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. यात कोणताही संघर्ष नाही. मतभेद असल्याच्या सर्व अफवा आहेत. कधीकधी मतभेद होऊ शकतात, पण मनभेद नाहीत. दोघांचेही ध्येय एकच आहे, देशाचे कल्याण.


प्रणव मुखर्जी आरएसएसच्या व्यासपीठावर आले, तेव्हा त्यांचा आरएसएसबद्दलचा गैरसमज दूर झाला. इतर राजकीय पक्षही त्यांचे मत बदलू शकतात. चांगल्या कामासाठी मदत मागणाऱ्यांना मदत मिळते. आणि जर आपण मदत करायला गेलो आणि ज्यांना मदत घ्यायची नसेल तर त्यांना मदत मिळत नाही.पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना तुरुंगात गेल्यानंतर त्यांचे पद जाण्याच्या विधेयकावर भागवत म्हणाले की, नेत्यांची प्रतिमा स्वच्छ असली पाहिजे. यावर कायदा करायचा की नाही हे संसद ठरवेल. पण नेत्याची प्रतिमा स्वच्छ असली पाहिजे, असे ते म्हणाले.


कोणतीही भाषा शिकण्यात काही अडचण नाही


'आपण ब्रिटिश नाही. आपल्याला ब्रिटिश व्हायचे नाही, पण ही एक भाषा आहे आणि भाषा शिकण्यात कोणतीही अडचण नाही. नवीन शिक्षण धोरणात पंचकोशी शिक्षणाची जी व्यवस्था करण्यात आली आहे, ती हळूहळू पुढे जाईल. संगीत, नाटक यासारख्या विषयांमध्ये रस निर्माण केला पाहिजे, परंतु काहीही सक्तीचे करू नये. वैदिक काळातील शिक्षणाच्या ६४ कलांमधून घेता येतील असे विषय घेतले पाहिजेत. गुरुकुल आणि आधुनिक शिक्षण एकत्र आणले पाहिजे. आधुनिक शिक्षण गुरुकुल पद्धतीशी जोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,' असेही त्यांनी यावेळी म्हटले.




Comments
Add Comment

दहशतवादी उमरच्या घरात होता बॉम्ब निर्मितीचा कारखाना

फरिदाबाद : दिल्ली कार स्फोट आणि दहशतवादी उमर यांच्याबाबत नवनवी माहिती हाती येऊ लागली आहे. स्फोट घडवणाऱ्या

तीन दिवसांत 28 काळवीटांचा मृत्यू; कर्नाटक प्राणीसंग्रहालयावर संशयाचे सावट

कर्नाटक : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर राणी चेन्नम्मा प्राणीसंग्रहालयात गेल्या तीन दिवसांत तब्बल 28 काळवीटांचा

गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन

पती संभाळ करत असला तरी आई मुलाकडून पालनपोषण खर्च मागू शकते

केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय तिरुवनंतपुरम  : पती जिवंत असेल आणि पत्नीचा सांभाळ करत असला तरीही आई

डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर

नवी दिल्ली  : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०

राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणार जयपूर विधानसभेतील डिजिटल संग्रहालय

जयपूर : संपूर्ण विधानसभेचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी आता डिजीटल पद्धतीचा वापर जयपूर विधानसभेत होणार आहे.