‘गोविंदा फक्त माझा आहे’

गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात घटस्फोटाची चर्चा सुरू होती. मात्र, गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर या जोडप्याने एकत्र येऊन या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. गोविंदाच्या घरी बाप्पाच्या आगमनावेळी सुनीताने मीडियाशी संवाद साधताना ‘गोविंदा फक्त माझाच आहे’ असे ठामपणे सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. सुनीताने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचा दावाही काही माध्यमांनी केला होता. या अर्जामध्ये ‘अत्याचार’ आणि ‘फसवणूक’ असे गंभीर आरोप केल्याचेही म्हटले जात होते. या अफवांवर दोघांनीही थेट प्रतिक्रिया दिली नव्हती. पण, यावर्षीच्या गणेश चतुर्थीनिमित्त गोविंदा आणि सुनीता त्यांच्या मुलांसोबत एकत्र दिसले. दोघांनीही मीडियासमोर एकत्र फोटो काढले आणि एकमेकांबद्दलचे प्रेम दाखवले. यावेळी गोविंदानेही आपल्या कुटुंबासाठी शुभेच्छा मागितल्या. त्याने म्हटले, ‘बाप्पाचा आशीर्वाद मिळाल्यावर कुटुंबातील सर्व दु:ख दूर होतात. मला विशेषतः माझा मुलगा यश आणि मुलगी टीना यांच्यासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. तुम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि आशीर्वाद द्यावा.’गोविंदा आणि सुनीता यांचा एकत्र फोटोमुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
Comments
Add Comment

सुपरस्टार अक्षय कुमारची संपत्ती किती ?

मुंबई : बॉलीवूड हे स्वप्नांचे शहर आहे, जिथे मेहनत, चिकाटी आणि अभिनयाच्या जोरावर सामान्य माणूसही सुपरस्टार बनू

अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाचे निदान

हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाहच्या आयुष्यात झाली 'ती'ची एन्ट्री

मुंबई : गणेशोत्सव सुरू आहे. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. अनेकांनी त्यांच्या नव्या

‘जॉली एलएलबी ३’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाचा वाद वाढतच चालला आहे. जॉली एलएलबी

गणरायाच्या आगमनाचा ‘कुली’ चित्रपटाला फायदा

सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त तीन चित्रपट उत्तम कमाई करत आहेत. एकीकडे ‘कुली’ आणि ‘वॉर २’ हे दोन मोठे चित्रपट चांगली

पार्थ पवार-जॅकलिन जोडीने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबईत ठिकठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी विविध