मुंबईकरांना दिलासा: गणेशोत्सवात 'एलिफस्टन पूल' सुरू राहणार; अनंत चतुर्दशीनंतर होणार पाडकाम

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. प्रभादेवी येथील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला एलिफस्टन पूल (Elphinstone Bridge) गणेशोत्सवापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, १० सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीनंतर हा पूल पाडण्यात येणार आहे.


गणेशोत्सवानंतर सुरू होणार पाडकाम
प्रभादेवी परिसरात गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. भाविकांची ये-जा लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पूल सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १० सप्टेंबरनंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करून त्याचे पाडकाम सुरू होईल. हा पूल १२५ वर्षे जुना आणि ब्रिटिशकालीन असून, धोकादायक झाल्यामुळे त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या ठिकाणी डबलडेकर पूल आणि शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टरची रचना उभी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.


स्थानिकांकडून विरोधाची शक्यता
या पुलाच्या पाडकामामुळे काही इमारतीदेखील जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांनी या निर्णयाला विरोध केला आहे. इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, त्यामुळे या पाडकामाचा विरोधाला तोंड द्यावे लागू शकते.


महत्त्वाचा दुवा
एलिफस्टन पूल हा मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. हा पूल परळ आणि प्रभादेवीला पूर्व-पश्चिम दिशेने जोडतो. या पुलाचा वापर परळहून दादर, लोअर परळ, तसेच प्रभादेवीहून लालबाग, शिवडी, परळकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.

Comments
Add Comment

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत

लोकलच्या दारात उभे राहणे म्हणजे निष्काळजीपणा नव्हे; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : स्वप्नांची दुनिया आणि मायानगरी असलेल्या मुंबईत प्रत्येक जण आपली स्वप्न पूर्ण करायला येत असतो. आणि बघता

आयआयटी बॉम्बेकडून भारतासाठी ‘स्वदेशी एआय’ची तयारी

भारतीय भाषांसाठी नव्या तंत्रज्ञान युगाची सुरुवात मुंबई : देशातील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल

भोसरी भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसे यांना दणका

दोषमुक्तीबाबतचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला मुंबई : एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना आपल्या पदाचा

कस्तुरबा रुग्णालयातील बर्न्स केअर कक्षाची होणार सुधारणा

आयसीयूसह सर्वसाधारण खाटांची जागा सुसज्ज मुंबई : संसर्गजन्य रोगाच्या आजारांसाठी असलेल्या कस्तुरबा

जुनी शालेय इमारत पाडताना पोर्टेबल पर्यायी शाळा आसपासच सुरु करणार

पुनर्विकास करण्यात येणाऱ्या शालेय इमारतींसाठी महापालिकेने उचलले असे पाऊल मुंबई : माहिममधील महापालिका शाळा