गणेशोत्सवानिमित्त रील स्पर्धेचे आयोजन; प्रथम बक्षीस १ लाख रुपये

मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवाला एक नवा आयाम देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एका अभिनव रील स्पर्धेचे आयोजन. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ करणार आहे.


सहभागासाठी ३ गट आणि महत्त्वाच्या तारखा


ही स्पर्धा राज्याच्या महसूल विभागीय स्तर, राज्यस्तर आणि महाराष्ट्राबाहेरील तसेच भारताबाहेरील अशा तीन गटांमध्ये होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करून आपला रील अपलोड करायचा आहे.


स्पर्धेचे विषय आणि नियम


विषय:पर्यावरण संवर्धन, स्वदेशी, गडकिल्ले, संस्कृती, आणि 'ऑपरेशन सिंदूर' हे स्पर्धेचे मुख्य विषय आहेत.
वेळमर्यादा:स्पर्धकांना ३० ते ६० सेकंदांचा रील बनवायचा आहे.


आकर्षक बक्षिसे


या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची आकर्षक बक्षिसे दिली जातील


महसूल विभागीय स्तर:
प्रथम क्रमांक: २५,००० रुपये
द्वितीय क्रमांक: १५,००० रुपये
तृतीय क्रमांक: १०,००० रुपये
उत्तेजनार्थ: ५,००० रुपये


राज्यस्तर आणि महाराष्ट्राबाहेर/भारताबाहेर (खुला गट)
प्रथम क्रमांक: १ लाख रुपये
द्वितीय क्रमांक: ७५,००० रुपये
तृतीय क्रमांक: ५०,००० रुपये
उत्तेजनार्थ: २५,००० रुपये


नोंदणी प्रक्रिया


या स्पर्धेसाठी नोंदणीकरिता गुगल फॉर्म उपलब्ध आहे. स्पर्धकांनी filmcitymumbai.org या संकेतस्थळावर किंवा महामंडळाच्या सोशल मीडिया हँडल्सवर भेट देऊन आपली नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे हस्तांतरित करू नये

उच्चाधिकार समितीचा निकाल सावंतवाडी : महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर ‘ये-जा’ करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तीन अधिकारी निलंबित !

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा

चौलच्या पर्वतवासी श्री दत्तात्रेय देवस्थानच्या यात्रेला सुरुवात

सोमवारी, ८ डिसेंबरला पाच दिवसाच्या यात्रेचा होणार समारोप अलिबाग : चौलच्या पर्वतवासी श्रीदत्तात्रेय

औद्योगिक वसाहतींतील अंतर्गत रस्त्यांची चाळण

औद्योगिक वसाहतींतील अंतर्गत रस्त्यांची चाळण महाड  : रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत सर्वच