मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात, या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल असून या पोर्टलवरील सर्व सेवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पुरवण्यात माव्यात. तसेच सर्व सेवा योग्यप्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्यादृष्टीनं सर्व तालुक्यांमध्ये एक रिंग तयार करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
वर्षा निवासस्थानी सेवा सुलभीकरणासाठी मुख्यमंत्री फडणवीस सांनी सोमवारी राज्यातील नागरिक सेवांसंदर्भात आढावा बैठक घेतली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकाच प्रकारच्या ९ सेवा एकत्र करण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अर्ज प्रक्रियेत लागणारी कागदपत्रांची संख्या कमी करण्यासाठी नियोजन करावे.
सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसमान असावेत, जेणेकरून राज्यभरातील नागरिकांना एकसंध अनुभव मिळेल, या सेवेच्या अंमलबजावणीसाठी रिंग व क्लस्टर प्रणाली राबवण्यात यावी. डिजिटल सेवा हबचा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.