सुझुकीने गुंतवणूकीची घोषणा करतात मारूती सुझुकीचे शेअर सुसाट !

  79

प्रतिनिधी:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील प्रथम सुझुकी ईव्ही कार प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. त्यावेळी सुझुकी मोटर जपानी वाहन निर्माता कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने मंगळवारी घोषणा केली की ते पुढील पाच ते सहा वर्षांत भारतात ७०००० को टी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही घोषणा करताच कंपनीच्या शेअरने २.३०% वाढ नोंदवली आहे. यावेळी येत्या ५-६ वर्षात ७०००० कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा करताना कंपनीने म्हटले आहे की,' गुंतवणुकीचा वापर उत्पादन वाढवण्यासाठी, नवीन कार मॉडेल्स सादर करण्यासाठी आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या ऑटोमोबाईल बाजारपेठेत त्यांचे नेतृत्व स्थान संरक्षित करण्यासाठी केला जाईल.' गुजरातमधील कंपनीच्या हंसलपूर प्लांटमध्ये मारुती सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही, 'ई-विटारा'च्या लाँचिंग दरम्यान सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांनी ही घोषणा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन समारंभात इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. ई-विटारा केवळ मारुती सुझुकी इंडियाच्या युनिट सुझुकी मोटर गुजरात (एसएमजी) येथे तयार केला जाईल आणि १०० हून अधिक देशांमध्ये निर्यात केला जाईल. पहिली शिपमेंट पिपावाव बंदरातून युरोपसाठी रवाना होईल, ज्यामध्ये यूके, जर्मनी, फ्रान्स, नॉर्वे, इटली आणि इतर अनेक बाजारपेठा समाविष्ट असतील.


सुझुकीने असेही म्हटले आहे केली की,' इलेक्ट्रिक एसयूव्ही जपानला निर्यात केली जाईल. तोशिहिरो सुझुकी म्हणाले की, गुजरातमधील ही सुविधा जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल हबपैकी एक म्हणून विकसित केली जात आहे ज्याची वार्षिक १० लाख युनि ट्सची नियोजित क्षमता आहे. आम्ही आमचे पहिले बॅटरी इलेक्ट्रिक वाहन, ई-विटारा तयार करण्यासाठी आणि ते जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी ही सुविधा निवडली गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आलेल्या या दिवसाला “ऐतिहासिक दिवस” म्हणून संबोधत, सुझुकीने भारताच्या हरित गतिशीलतेला चालना देण्याच्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कंपनीने कौतुक केले.'सुझुकीने चार दशकांहून अधिक काळ भारताच्या गतिशीलतेच्या प्रवासात अभिमानाने भागीदारी केली आहे आणि आम्ही शाश्वत गतिशीलतेच्या भारता च्या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विकसित भारताला योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहोत' असे कंपनीने म्हटले.


विक्री आणि महसुलाच्या बाबतीत भारत सुझुकीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे, मुख्यत्वे तिच्या बहुसंख्य मालकीच्या उपकंपनी, मारुती सुझुकी, देशातील सर्वोच्च कार निर्माता कंपनीद्वारे सुझुकीचे उलाढाल चालते. गेल्या काही वर्षांत, सुझुकीने भारतात १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे त्याच्या मूल्य साखळीत (Value Chain) ११ लाखांहून अधिक थेट नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. ई-विटारा लाँच सोबतच, कंपनीने भारतातील पहिल्या लिथियम-आयन बॅटरी आणि सेलचे उत्पादन इलेक्ट्रोड -लेव्हल लोकलायझेशनसह सुरू करून आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. हायब्रिड वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या बॅटरी आता फक्त कच्चा माल आणि काही सेमीकंडक्टर भाग जपानमधून आयात करून भारतात बनवल्या जातील. सुझुकीने म्हटले आहे की हे पाऊल 'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेने एक मजबूत पाऊल आहे आणि कंपनी कार्बन न्यूट्रॅलिटी ध्येये पूर्ण करण्यासाठी 'मल्टी-पॉवरट्रेन स्ट्रॅटेजी'चे अनुसरण करेल. यामध्ये इलेक्ट्रिक वाहने, मजबूत हायब्रिड, इथेनॉल फ्लेक्स-फ्युएल वाहने आणि कॉम्प्रेस्ड बा योगॅसचा समावेश आहे.

Comments
Add Comment

रूपयाची पातळी ८८.१५ प्रति डॉलर पोहोचली रूपया नव्या निचांकी पातळीवर!

मोहित सोमण:आजही डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने रूपया नव्या निचांकी पातळीवर घसरला आहे. आज सकाळी प्रति

'अर्थव्यवस्था मजबूतच' वित्त मंत्रालयाच्या सुत्रांची माहिती अर्थतज्ज्ञांचे काय आहे मत जाणून घ्या एका क्लिकवर!

मोहित सोमण: पहिल्या तिमाहीत भारताने ७.८% वाढीसह भारताने अभूतपूर्व कामगिरी केली होती. याच धर्तीवर वित्त

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : “मराठ्यांचं पाणी बंद केलं तर आयुक्तांना सुट्टी नाही!” BMC आयुक्तांना जरांगेंचा थेट इशारा; म्हणाले,“कधी ना कधी हिशोब होणारच”...फक्त नाव लिहून ठेवा!

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेले मराठा समाजाचे आंदोलन (Maratha

जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईकरांचे हाल, पोलिसांच्या सुट्या रद्द, रस्ते वाहतूक मंदावली

मुंबई : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी मुंबईत

प्रवासी गाड्यांच्या विक्रीत महाराष्ट्रच नंबर वन

प्रतिनिधी:प्रवासी गाड्यातील विक्रीत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागला आहे. एप्रिल ते जून महिन्यात प्रवासी

युके, कतार आता युएई? भारत व युएई यांच्यात CEPAद्विपक्षीय करारावर चर्चा संपन्न

प्रतिनिधी:केंद्रीय औद्योगिक व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी कतार भारताशी द्विपक्षीय एफटीए (FTA) करण्यास इच्छुक