आता मेट्रो-३ रविवारीही सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ ही मेट्रो ३ ची सेवा आता रविवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. मेट्रो ३ मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सेवा सकाळी ८.३० वाजता सुरू होते. पण आता मात्र ३१ ऑगस्टपासून मेट्रो ३ ची सेवा रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू राहणार आहे.


मेट्रो-३ मार्गिकेतील आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा टप्पा सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून सोमवार ते शनिवारदरम्यान सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत मेट्रो ३ धावते. तर रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी ८.३० ते रात्री १०.३० या वेळेत सुरू राहते. सुट्टीच्या दिवशी सकाळी मेट्रोने प्रवास करता येत नसल्याने प्रवाशांची काहीशी गैरसोय होत होती. पण आता मात्र प्रवाशांची ही गैरसोय आता दूर होणार आहे.


कारण, आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही मेट्रो ३ ची सेवा सकाळी लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मेट्रोची सेवा सकाळी ८.३० ऐवजी सकाळी ६.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ही दिलासादायक बाब आहे. गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत भाविक गणपती दर्शनासाठी येत-जातात. तर देखावा पाहण्यासाठी जाणाऱ्या-येणाऱ्यांची ही संख्या मोठी असते. अशावेळी गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी एमएमआरसीएलने सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान मेट्रो ३ च्या सेवा कालावधीत रात्रीच्या वेळेत दीड तासांची वाढ होणार आहे. दीड तासांने सेवा कालावधी वाढणार असल्याने फेऱ्यांमध्येही वाढ होणार आहे. ७ सप्टेंबरपासून मात्र रविवार ते सोमवार दरम्यान सकाळी ६.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत धावणार आहे.

Comments
Add Comment

वर्षाच्या पहिल्याच दिवशीच मुंबईत पाऊसच आगमन

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस आल्याने मुंबईकरांना आनंदाचा सुखत धक्का बसला आहे. वाढत्या

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इक्बाल सिंग चहल मुख्य निरीक्षक

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला

नव्या विमानतळाच्या धावपटटीच्या कार्यक्ष्मतेसाठी ‘टॅक्सीवे एम’ कार्यान्वित

गर्दीच्या वेळी आगमन आणि प्रस्थानाचा गोंधळ टळणार मुंबई : जगातील सर्वात जास्त व्यस्त सिंगल-रनवे विमानतळांपैकी एक

मध्य रेल्वेला पार्सल वाहतुकीतून १८३ कोटी रुपयांची कमाई

मुंबई : चालू आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने नियोजित पार्सल गाड्या, भाडेतत्त्वावरील पार्सल गाड्या आणि मागणीनुसार

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

अहिल्यानगर आणि नाशिक येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती मुंबई : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण

समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार

भिवंडी बायपास रस्त्याचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार मुंबई : भिवंडी बायपास रस्त्याचे काम आता अंतिम