मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच कफ परेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार, तरुणीच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा देखील दिसून आल्या आहेत. त्यामुळे ही हत्या आहे कि आत्महत्या आहे? याबाबत पोलिस तपास करत आहेत. सध्या हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मनिता गुप्ता असं मृत तरुणीचे नाव असून ती २४ वर्षाची आहे. ही तरुणी कालपासून बेपत्ता होती. कफ परेड पोलीस ठाण्यात या बाबत बेपत्ता झाल्याची तक्रारदेखील करण्यात आली होती. त्यामुळे या घटनेमागील गूढ अधिक वाढले असून पोलीस तपासाअंती सत्य कळू शकणार आहे.