शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अहमदाबाद येथे दिले. अमेरिका भारतावर २७ ऑगस्टपासून ५० टक्के टॅरिफ लादत असतानाही, भारतातील शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.


पंतप्रधान म्हणाले की, कितीही दबाव आला तरीही माझे सरकार लघू उद्योजक, शेतकरी आणि पशुपालकांचे हित जपेल. आम्ही सहनशक्ती वाढवत आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचे नुकसान होणार नाही याची मी खात्री देतो असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा आणि काँग्रेसच्या धोरणांचा उल्लेख करत सांगितले की, जगाने पाहिले आहे की आम्ही पहलगाम नरसंहाराचा बदला २२ मिनिटांत घेतला.


गुजरात ही दोन मोहनांची भूमी आहे – सुदर्शनधारी आणि चरखाधारी. एकाने देशाला सैन्यशक्तीचे प्रतीक बनवले, तर दुसऱ्याने आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला. पंतप्रधान मोदी हे २५ आणि २६ ऑगस्ट रोजी गुजरातच्या दौऱ्यावर असून, त्यांनी अहमदाबादमध्ये सुमारे 3 किलोमीटरचा रोड शो केला. नरोडा ते निकोल मार्गावर झालेल्या या रोड शोमध्ये त्यांनी जनतेला हात हलवत अभिवादन केले.


यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधानांनी या दौऱ्यात 5477 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये साबरमती ते काटोसनदरम्यान धावणाऱ्या नव्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

Comments
Add Comment

जलद डिलिव्हरीच्या वेळापत्रकावर सरकारची भूमिका; क्विक कॉमर्स कंपन्यांना मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली :ऑनलाइन डिलिव्हरी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत केंद्र सरकारने

मासिक पाळीतील तीव्र वेदनांनी १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू; महिलांच्या आरोग्याविषयी गंभीर प्रश्न

कर्नाटक : मासिक पाळीशी संबंधित वेदना अनेकदा हलक्याने घेतल्या जातात. मात्र अशा वेदना एखाद्या व्यक्तीसाठी प्रचंड

टाकाऊ कपड्यांतून साकारली कलाकृती; पंतप्रधान मोदीचं ६ फूट पोर्ट्रेट चर्चेत

ब्रह्मपूर (ओडिशा):येथील तरुण फॅशन डिझायनर्सनी आपल्या कल्पकतेतून आणि परिश्रमातून एक अनोखी कलाकृती साकारत

काँग्रेसच्या माजी आमदाराला अटक; एनआरआय महिलेच्या तक्रारीवरून तिसरं प्रकरण उघड

पथनमथिट्टा (केरळ) : काँग्रेस पक्षाचे माजी नेते आणि आमदार राहुल ममकुटाथिल यांना महिलेशी गैरसंबंधान बाबत गंभीर

ताजमहालचे तळघर उघडणार! ३ दिवस मोफत पाहण्याची संधी

उर्सच्या कालावधीत पर्यटकांना आणि भाविकांना विशेष सवलती आग्रा: जगातील सातवे आश्चर्य मानल्या जाणाऱ्या

रायसीना हिल्सजवळ पंतप्रधान मोदींचे नवे कार्यालय

निवासस्थानही बदलणार नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रायसीना हिल्स परिसरातील नवे कार्यालय आता