OYO आपला ७ ते ८ अब्ज डॉलरचा आयपीओ आणणार? तसेच ब्रँडीगमध्ये मोठे बदल होणार - सुत्रांची माहिती

  34

प्रतिनिधी:ओयो ही लोकप्रिय हॉटेल बुकिंग व ट्रॅव्हल कंपनी नोव्हेंबरपर्यंत आपल्या आयपीओसाठी सेबीकडे अर्ज करणार आहे. अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली असून साधारण नोव्हेंबरपर्यंत या आयपीओसाठी कंपनी सेबी (Security Exchange Board of India SEBI) कडे डीएचआरपी (Draft Red Hearing Prospect DHRP) फाईल करणार असल्याचे माहिती मिळत आहेत. तब्बल ७ ते ८ अब्ज डॉलरचा आयपीओ बाजारात अपेक्षित असून यासाठी या दृष्टीने ओयोने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या संचालक मंडळाकडून पुढील आठवड्यात कंपनी रितसर परवानगी घेऊ शकते.


प्रसारमाध्यमांना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,'OYO च्या डीएचआरपी (DRHP) किंवा आयपीओ (IPO) संबंधित योजनांशी संबंधित कोणत्याही वेळेवर आम्ही भाष्य करू शकत नाही, कारण हा निर्णय ओयो (OYO) च्या संचालक मंडळाद्वारे मार्गदर्शन केला जाईल आणि तो पूर्णपणे त्यांच्या विवेकबुद्धीनुसार असेल. सध्या तरी, ओयो त्यांच्या भागधारकांसाठी मूल्य वाढविण्यासाठी विविध धोरणात्मक पर्यायांचे मूल्यांकन करत आहे. सूत्रांंनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या अतिरिक्त माहितीनुसार, अलीकडच्या आठवड्यात प्रमुख बँकिंग भागीदारांसोबत कंपनीच्या चर्चा वाढल्या आहेत, मूल्यांकन मार्गदर्शन (Valuation GuidanceK आता ७-८ अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे ७० प्रति शेअर) वर आहे, जे ईबीटा म्हणजेच करपूर्व कमाई (EBITDA) च्या २५-३० पट असू शकते असे म्हटले जात आहे.


वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नोव्हेंबरसाठी नियामकांकडे अर्ज दाखल करण्याचा विचार केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून, सॉफ्टबँकने बाजारातील भावनांचे मूल्यांकन करण्यासाठी लंडनमधील अ‍ॅक्सिस, सिटी, गोल्डमन सॅक्स,आयसीआयसीआ य, जेएम फायनान्शियल आणि जेफरीज सारख्या बँकांशी संपर्क साधला आहे. बाजारातील अभिप्रायाचे मूल्यांकन केल्यानंतर, त्यांना आता त्यांच्या निर्णयावर विश्वास आहे. कंपनी तपशील (Details) निश्चित करत असताना आणि प्रमुख धोरणात्मक घटकांना अंति म रूप देत असताना पुढील आठवड्यात बोर्डाशी संपर्क साधला जाईल' असे घडामोडींबद्दल माहिती असलेल्या एका व्यक्तीने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.सॉफ्टबँक अजूनही ओयोच्या सर्वात मोठ्या भागधारकांपैकी (Stakeholders) एक आहे. संभाव्य दाख ल्यात (Prospective) मध्ये ओयोची नवीनतम तिमाहीची आर्थिक कामगिरी दर्शविली जाईल, जी मजबूत वाढीच्या कालावधीचा आणि सुधारित मूलभूत तत्त्वांचा (Improved Fundamentals) फायदा घेईल'.


व्यवसायाची पुनर्रचना करण्याची तयारी -


ओयो एक नवीन मूळ ब्रँड ओळख आणण्यावर काम करत आहे जी त्यांच्या विस्तारित पोर्टफोलिओला एकत्रित करेल. त्यामुळे कंपनीने आपल्या ब्रँड पोझिशनिंगमध्ये बदल करण्याचे ठरवले आहे. कंपनी आपल्या प्रिमियम हॉटेल श्रेणीसाठी नवे अँप बाजारात आ णण्याची शक्यता आहे. याविषयी कंपनीने कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, ओयोचे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे त्यांच्या मूळ संस्थेसाठी ओरवेल स्टेज लिमिटेडसाठी नाव सूच ना मागवल्या. या सरावातून निवडलेले नाव गटाचे नवीन नाव (New Group Name) असू शकते.ओयो एक नवीन मूळ ब्रँड ओळख आणण्यावर काम करत आहे जी त्यांच्या विस्तारत असलेल्या पोर्टफोलिओला एकत्रित करेल असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

वांद्रे येथे ५२ फुटी काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा

मुंबई : दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

बाप्पाच्या आगमनापूर्वी सोने स्वस्त पण चांदी महाग झाली 'ही' आहेत कारणे जाणून घ्या आजचे दर

मोहित सोमण:आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर आज व गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पुन्हा सोन्यात घसरण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना