जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. जैसलमेरपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघा गावानजीक तलावाजवळ खोदकाम करताना स्थानिकांना काही असामान्य आणि मोठ्या सांगाड्याच्या रचनेसारखे दिसणारे जीवाश्म सापडले. ज्याचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे.

जैसलमेरपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघा गावात तलावाजवळ खोदकाम करताना स्थानिकांना मगरीच्या आकारासारखे दिसणाऱ्या अस्थी सापडल्या. ज्याची माहिती मिळताच फतेहगड उपविभागीय दंडाधिकारी आणि तहसीलदार यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि अवशेषांची पाहणी केली. त्या दरम्यान तलावाजवळ आढळलेले अवशेष हे डायनासॉरच्या पाठीचे कण्याचे हाडे असावेत असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) खात्याद्वारे हे जीवाश्म डायनासॉरचे नसून, फायटासॉरचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

जैसलमेरमध्ये गेल्या काही वर्षांत अशाप्रकारे अनेक जीवाश्म सापडले आहेत. ज्यात थियटमधील हाडांचे जीवाश्म, डायनासोरच्या पावलाचे ठसे आणि २०२३ मध्ये सापडलेले एक चांगले जतन केलेले डायनासोरचे अंडे यांचा समावेश आहे. मेघा गावातील प्राचीन तलावाजवळील हा शोध कदाचित या प्रदेशातील डायनासोरशी संबंधित पाचवा शोध असेल.
Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी