त्यामुळे गणपतीआधीच भाजपने उद्या (सोमवारी) तातडीची बैठक बोलावली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बैठक बोलावली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजपाची तातडीची बैठक आहे.
मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार व मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार प्रविण दरेकर उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत मुंबईचे सहा जिल्हाध्यक्ष आणि महामंत्री उपस्थित राहणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात महत्वाची चर्चा होणार आहे.
सकाळी 9 वाजता भाजपा प्रदेश कार्यालयात बैठक होणार आहे. या प्रभाग रचनेच्या घोषणेनंतर भाजपनं आपलं मिशन बीएमसीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तातडीची रणनीती बैठक बोलावली आहे.
मुंबई महापालिका जिंकायची असा चंगच भाजपने बांधला आहे. सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.
या बैठकीला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मुंबईतील सहा जिल्हाध्यक्ष आणि महामंत्री यांनाही या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.