गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी


नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण यशस्वी झाल्याचे इस्रोने सांगितले.


एअर ड्रॉप चाचणीत पॅराशूटच्या मदतीने अंतराळयानाचा वेग कमी करण्याचे तंत्र वापरण्यात आले. या चाचणीत हवाई दल, डीआरडीओ, नौदल आणि तटरक्षक दल सहभागी झाले. परस्पर समन्वयातून ही चाचणी यशस्वी झाल्याचे इस्रोने जाहीर केले.


गगनयान मोहिमेसाठी इस्रोने रॉकेट तयार केले आहे. या रॉकेटची जमिनीवर यशस्वी चाचणी झाली. इस्रोने अंतराळ यानासाठी क्रू मॉड्युल आणि सर्व्हिस मॉड्युलसाठीचे इंजिन तयार केले असून त्याची चाचणीही यशस्वी झाली आहे. क्रूच्या रक्षणासाठी पाच प्रकारच्या मोटर तयार करण्यात आल्या आहेत. या सर्व मोटरच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. मोहिमेसाठी नियंत्रण कक्ष, मुख्य केंद्र, क्रू प्रशिक्षण केंद्र, लाँच पॅड सज्ज आहे. मानवविरहीत क्रू मॉड्युल आणि सर्व्हिस मॉड्युल तयार आहे. या मॉड्युलच्या सुरुवातीच्या काही चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. क्रू ला परत आणण्यासाठीचे उपकरण आणि योजना तयार असल्याची माहिती इस्रोने दिली.


गगनयान मोहिमेद्वारे इस्रो भारताचे अंतराळ क्षेत्रातले सामर्थ्य वाढवणार आहे. नियोजनानुसार इस्रो २०३५ पर्यंत अंतराळात देशाचे पहिले अंतराळ स्थानक उभारणार आहे. तसेच २०४० पर्यंत पहिला भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरवण्याचे नियोजन आहे.


भारताच्या प्रस्तावीत अंतराळ स्थानकाचे एकूण पाच भाग असतील. यातील पहिल्या भागाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. चांद्र मोहिमेसाठी रॉकेट आणि इतर यंत्रणाच्या विकासाचे काम वेगाने सुरू आहे. गगनयान आणि चांद्र मोहिमेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आले आहेत. गगनयानसाठी प्रशिक्षण सुरू आहे.


Comments
Add Comment

"लवकर तोडगा निघेल अशी आशा..." ट्रम्पच्या H-1B व्हिसा शुल्क वाढीवर भारताची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा अर्जांवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने पहिली

आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदी करणारा पहिला तरुण

नवी दिल्ली : मुंबईमध्ये राहणाऱ्या अंकुश गोयल याने भारतातील पहिला आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदी करण्याचा मान मिळवला

दिल्लीमध्ये एआयचा गैरवापर करून महिलेवर अत्याचार

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये लाहोरी गेट परिसरात एआयचा गैरवापर करून एका महिलेवर अत्याचार करण्यात आले. त्या महिलेने

झिरो बॅलेन्स अकाऊंट असूनही एटीएममधून काढले पैसे

एटीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची झुंबड जयपूर : राजस्थानच्या अलवर आणि मेवात परिसरात असलेल्या स्टेट बँक

Zubin Garg Death: गायक झुबीन गर्गचे अपघाती निधन की हत्या? व्यवस्थापक आणि आयोजकावर गुन्हा दाखल

गुवाहाटी: 'या अली', 'जाणे क्या होगा रामा रे', 'दिलरुबा' सारखे बॉलीवूड मधील सुपरहिट गाणी देणारा सुप्रसिद्ध

परावलंबन हाच देशाचा मोठा शत्रू; स्वावलंबी बनण्याचे पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली : या जगात आपला कोणीही शत्रू नाही. भारताचा कोणी शत्रू असेल तर तो म्हणजे इतर देशांवरील आपलं अवलंबित्व. आपण