गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

  14

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार


मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी केवळ मुंबईतलेच नाही तर महाराष्ट्रासह देश-विदेशातूनही भाविक, पर्यटक गर्दी करतात. या काळात सार्वजनिक वाहतुकीवर ताण येतो. विशेषतः रात्री उशिरापर्यंत दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांसाठी वाहतुकीची गैरसोय होते. याच पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने अतिरिक्त बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत दररोज रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत विशेष बस धावणार आहेत.


बेस्ट उपक्रमाकडून सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त बस दहा मार्गांवर सुरु राहतील. विशेष लक्ष शिवाजी पार्क, गिरगाव चौपाटी व मरीन लाइन्स या प्रमुख ठिकाणी जाणाऱ्या मार्गांवर केंद्रित करण्यात आले आहे. कांदिवली, बोरिवली, वांद्रे, मुलुंड, वडाळा, दादर व देवनार आगारांतून या बस सोडल्या जाणार आहेत. प्रत्येक मार्गावर सरासरी तीन बस धावतील, तर काही महत्त्वाच्या मार्गांवर दोन बसची अतिरिक्त सोय असेल. देश-विदेशातूनही अनेक पर्यटक मुंबईतील गणेश दर्शनासाठी येतात. मुंबईतील सार्वजनिक, प्रसिद्ध गणेश मंडळे आणि गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात.


दिवसा बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्या पुरेशा उपलब्ध असतात. रात्रीच्या वेळी कमी प्रमाणात बेस्टच्या सेवा उपलब्ध असतात. त्यामुळे भाविक आणि पर्यटकांसाठी ७ ते १६ सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालविण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे.


फोर्ट, गिरगाव, चर्नी रोड, भायखळा, लालबाग, परळ या परिसरांत गर्दी होते. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी या अतिरिक्त बससेवा दिल्या जाणार आहेत. प्रशासनाने आवाहन केले आहे, की गणेशोत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा. उपलब्ध करून दिलेल्या विशेष बससेवांचा लाभ घेतल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल आणि प्रवास अधिक सुरक्षित होईल, असेही बेस्टकडून सांगण्यात आले आहे.


‘या’ मार्गावर उपलब्ध असणार बससेवा


कुलाबा परिसरातून उत्तर-पश्चिम मुंबईकडे गिरगाव, लालबाग, परळ, चेंबूरमार्गे बस चालविण्यात येणार आहेत. बसमार्ग क्रमांक ४ मर्या. जे.जे रुग्णालय ते ओशिवरा आगार, ८ मर्या. जिजामाता उद्यान ते शिवाजी नगर, ए – २१ डॉ. एस. पी. एम. चौक ते देवनार आगार, ए -२५ बॅकबे आगार ते कुर्ला आगार, ए-४२ कमला नेहरू पार्क ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानक, ४४ वरळी व्हिलेज ते एस. यशवंते चौक (काळाचौकी), ६६ इलेक्ट्रिक हाऊस ते सांताक्रूझ आगार, ६९ डॉ. एस.पी.एम. चौक ते पी.टी. उद्यान, शिवडी, व सी -५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते काळाकिल्ला आगार या बसमार्गावर रात्रीच्या जादा बस फेऱ्या धावतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.


एमएसआरटीसी मुंबईहून कोकणात ५,२०० विशेष बस चालवणार


गणेश चतुर्थी उत्सव जवळ येताच मुंबई, ठाणे आणि पालघर येथील कोकणात जाणाऱ्या भाविकांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी)ला मोठी पसंती दर्शविली आहे. परिवहन मंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या मते, गणपती उत्सवासाठी ४,४७९ गट आरक्षण बसेससह ५,१०३ विशेष बसेस आधीच पूर्णपणे बुक झाल्या आहेत.

Comments
Add Comment

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली