ठाण्यात एकूण प्रभागांची संख्या ३३ असणार आहे. त्यापैकी ३२ प्रभागात ४ नगरसेवक तर फक्त एका प्रभागात ३ नगरसेवक असणार आहे. २०१७ प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात आली असून जनगणना झालेली नसल्यामुळे नगरसेवक संख्येत वाढ झालेली नाही.
यंदाही १३१ नगरसेवक आणि ३३ प्रभाग अशी रचना जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान ठाणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचना तयार केली असून यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली होती.
यात विविध विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीने प्रभाग रचना तयार करून ती प्रसिद्ध केली आहे. गेल्या म्हणजेच २०१७ साली झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना होती. त्यात ३२ प्रभाग चार सदस्यांचे तर, एक प्रभाग तीन सदस्यांचा होता. अशी एकूण ३३ प्रभागातून १३१ नगरसेवक निवडुण आले होते. यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम ठेवण्यात आल्याने प्रभाग आणि नगरसेवक संख्येत वाढ झालेले नाही.