मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर

  49

सिंधुदुर्गांतील भावी पिढीच्या भविष्यासाठी मंत्री नितेश राणे आक्रमक


दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी पोलिसांची छापेमारी; गुटका, दारू, मटका, जुगार अड्ड्यांवर सिंधुदुर्ग पोलिसांची छापेमारी व अटक सत्र सुरू


सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः धाड टाकल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर गेले आहेत. जिल्ह्यातील सर्व मटका जुगार अड्डे थांबवले गेले असून दर दिवशी होणारा लाखो रुपयांचा चुराडा या कारवाईमुळे थांबविला गेला आहे. कणकवलीचे पोलीस निरीक्षक यांचे या प्रकरणात झालेले निलंबन जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांना रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यां विरोधात जिल्ह्यात पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे व यात गुंतलेल्या संशयित गुन्हेगारांचे अटक सत्र सुरू झाले आहे.


जिल्ह्यातील दारू मटका जुगार या अवैध धंद्यांवर पोलीस दलाने छापेमारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी या कारवाया पोलिसांनी केल्या आहेत. कणकवलीमधील घेवारी यांच्या मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी घातलेली धाड जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर कृत्ये रोखण्यासाठी दिशा देणारी ठरली आहे. बेकायदेशीर दारू,मटका जुगार, चरस गांजा अशा नशेली पदार्थांच्या रॅकेटमुळे सिंधुदुर्गची भावी पिढी बरबाद होता नये यावर पोलिसांनी अंकुश ठेवावा, असे स्पष्ट आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन दिले होते. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा बेकायदेशीर कृत्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा होत आहे. भावी पिढीचे त्यात मोठे नुकसान होत आहे. याबाबत गांभीर्याने घ्यावे, असे स्पष्ट निर्देशाने दिले होते. आता पोलिसांनी जिल्ह्यातील असे बेकायदेशीर अड्डे व ते चालवणारे नेटवर्क मोडण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर छापेमारी सुरू केली आहे.


पोलीस दलाचे प्रमुख जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अशा यंत्रणेकडून शनिवारी पूर्ण दिवस जिल्हाभर या कारवाया करण्यात आल्या आहेत. संशयित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून अटक सत्र ही सुरू झाल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरेंच्या घरी जाणार उद्धव ठाकरे

मुंबई : गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत.

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण