भारत-पाकिस्तानची हवाई क्षेत्रं २४ सप्टेंबरपर्यंत एकमेकांसाठी बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबर २०२५ पर्यंत बंद ठेवले आहे. ही बंदी खासगी, व्यावसायिक तसेच लष्करी उड्डाणांवर देखील लागू आहे.


जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ हिंदू नागरिकांची जिहादी दहशतवाद्यांनी टार्गेट किलींग केल्यानंतर , भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद केले. ही बंदी सुरुवातीला २४ मेपर्यंत होती, मात्र नंतर ती महिन्यागणिक वाढवण्यात आली आहे. भारत सरकारने नव्याने जारी केलेल्या नोटीस टू एअरमॅन (एनओटीएएम) अनुसार, पाकिस्तानी नोंदणीकृत किंवा त्यांच्या एअरलाइन्स/ऑपरेटरद्वारे चालवली जाणारी कोणतीही उड्डाणे २३ सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपासून २४ सप्टेंबर सकाळी ५.३० वाजेपर्यंत भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करू शकणार नाहीत.



दुसऱ्या बाजूला, पाकिस्ताननेही २० ऑगस्ट रोजी एनओटीएएम जारी करून भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही बाह्य मध्यस्थी स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या हवाई क्षेत्र बंदीमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला

आधार कार्ड पुन्हा एकदा बदलणार

नाव असेल ना पत्ता, फोटोसोबत असेल क्युआर कोड नवी दिल्ली : सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्डशिवाय पर्याय नाही.

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ