Online Gaming Regulation Act जाहीर झाल्यावर ड्रीम ११ ची मोठी घोषणा! आता जिंकल्यावर पैशांऐवजी मिळणार...

  104

नवी दिल्ली: 'ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५' ला राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिल्यानंतर, आता त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे आता भारतात रिअल मनी बेस्ड गेमिंगचा प्रचार किंवा त्याची जाहिरात कारणे गुन्हा असणार आहे. भारत सरकारच्या या निर्णयामुळे ड्रीम ११, एमपीएल, झुपी सारख्या कंपन्यांवर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ड्रीम ११ (Dream 11) ने काल उशिरा रात्री एक भावनिक संदेश पोस्ट केला, ज्यात त्यांनी म्हंटले, "दुसऱ्या डावात भेटू".


सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करताना ड्रीम ११ ने म्हटले आहे की, 'आम्ही आमच्या दुसऱ्या डावात तुम्हाला भेटू.' ड्रीम ११ च्या या ट्विटवरून हे स्पष्ट होते की आता कंपनीकडे ते सुरू ठेवण्यासाठी कोणताही पर्याय उरलेला नाही.


याआधीही रिअल मनी बेस्ड गेमिंग प्लॅटफॉर्मवर अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. पण, असे प्लॅटफॉर्म असा युक्तिवाद करत असत की ते सट्टेबाजीला प्रोत्साहन देत नाहीत. उलट, त्यांचे प्लॅटफॉर्म फक्त कौशल्याला प्रोत्साहन देते.



ऑगस्ट २०२५ पर्यंत ड्रीम ११ चे २८० हून अधिक वापरकर्ते आहेत. ड्रीम ११ हे जगातील सर्वात मोठे फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर करोडो वापरकर्ते क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल आणि हॉकी सारख्या खेळांमध्ये भाग घेत आहेत.



अजूनही ड्रीम ११ वर खेळू शकतो का?


सरकारने रिअल मनी बेस्ड गेमिंगवर बंदी घातल्यानंतर, ड्रीम ११ ने त्याच्या प्लॅटफॉर्मवर पैसे ठेवण्याचा पर्याय काढून टाकला आहे. मात्र, वापरकर्त्यांसाठी विनामूल्य स्पर्धा खेळण्याचा पर्याय अजूनही उपलब्ध आहे.


शुक्रवार रात्रीपासून, क्रिकेट श्रेणीतील दोन सामने खेळण्याचा पर्याय सध्या ड्रीम ११ अॅपवर दिसत आहे. हे दोन्ही पर्याय विनामूल्य आहेत. म्हणजेच, वापरकर्ते विनामूल्य स्पर्धेत सामील होऊ शकतात. विशेष म्हणजे विनामूल्य स्पर्धेत देखील वापरकर्त्यांना मोठे बक्षीस जिंकण्याची संधी आहे. जर एखादा वापरकर्ता रँक १ ते २० पर्यंत आला तर त्याला आयफोन १६ मिळेल.



ड्रीम ११ ने X वर काय म्हटले?




ड्रीम ११ ने एक्स वर पोस्ट केले आणि लिहिले की, आज सकाळी आम्ही ड्रीम ११ वरील सर्व पैशांचे सामने बंद केले आणि पूर्णपणे फ्री-टू-प्ले ऑनलाइन सोशल गेमकडे वळलो आहोत. मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया, मेड बाय इंडिया या विचारसरणीखाली १८ वर्षांपूर्वी एक स्पोर्ट्स टेक कंपनी म्हणून हा प्रवास सुरू झाला.


आमची कायद्याच्या अंतर्गत काम करणारी कंपनी आहे आणि आजवर आम्ही नियमांनुसार व्यवसाय केला आहे. आम्हाला वाटते की प्रगतीशील नियमावली हा योग्य मार्ग आहे, आम्ही कायद्याचा आदर करू आणि "ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन कायदा, २०२५" चे पूर्णपणे पालन करू. आम्ही आणि आमची टीम भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवण्याच्या पंतप्रधानांच्या ध्येयाला पाठिंबा देऊ.

Comments
Add Comment

अनिल अंबानी पुन्हा अडचणीत, ईडीनंतर अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे

अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकल्यानंतर आता सीबीआयने देखील उद्योगपती

Online Gaming Regulation Bill 2025: ऑनलाइन गेमिंगवर अखेर बंदी; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने ऑनलाइन मनी गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक मांडले होते. लोकसभा आणि

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांचे आवाहन

नवी दिल्ली : महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम येथे सुरू असलेल्या गणेशमूर्ती

जर पाकिस्तान अजूनही डंपर असेल तर ते त्यांचे अपयश आहे - राजनाथ सिंह

नवी दिल्ली : अलीकडेच आसिम मुनीर त्यांच्या विधानामुळे पाकिस्तानमध्येच नव्हे तर संपूर्ण

सायबर हल्लेखोरांच्या यादीत भारत जगात अव्वल

नवी दिल्ली: भारतासाठी एक अत्यंत चिंताजनक बाब समोर आली आहे. स्विस सायबर सुरक्षा फर्म 'अ‍ॅक्रोनिस'ने नुकत्याच

बिहार विधानसभा निवडणूक: मतदार यादीतील नावांसाठी आधार कार्ड आता वैध

नवी दिल्ली: बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरावृत्ती (Special