पिंपळी नदीवरील ५० वर्ष जुना पूल खचला, पूल वाहतुकीसाठी तात्काळ बंद

चिपळूण: सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात आपापल्या गावी लोकं मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. त्यामुळे या काळांत कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा आणि महामार्गाची विशेष पाहणी केली जात आहे. यादरम्यानच एक मोठी बातमी समोर येत आहे.  रत्नागिरी येथील दसपटीला जोडणारा पिंपळी नदीवरील पूल अचानक खचला असल्याचे वृत्त आले आहे. तब्बल १९६५ साली बांधलेला हा पूल जुना झाल्यामुळे खचला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


पिंपळी – नांदिवसे रस्त्यावरील ५० वर्ष जुना असलेला पिंपळी नदीवरील पूल अचानक खचल्याने दसपटीकडे जाणारी सर्व वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली आहे. या पुलाच्या काही भागांना तडे गेल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, उपअभियंता अरुण मुळजकर, ज्युनिअर इंजिनिअर महेश वाजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाची पाहणी केल्यानंतर कोणताही मोठा अपघात टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.



पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन


दसपटी विभागाकडे जाणारे प्रवासी आणि वाहनचालक यांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पिंपळी – पेढाबे फाटा – खडपोली या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे दसपटी विभागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावेळी राजू मेस्त्री, संदेश मोहिते (खेर्डी), विलास मोहिते, मुराद अडरेकर, फिरोज कडवइकर (सरपंच, खडपोली) यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. हा पूल पिंपळी गाणे आणि खडपोली एम.आय.डी.सी.ला जोडणारा असल्यामुळे वाहतूक बंद झाल्याने मोठे गैरसोय होत आहे.

Comments
Add Comment

भारताने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात उभारला धावांचा डोंगर

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये झिम्बाब्वे विरूद्धच्या सुपर एट फेरीतील सामन्यात भारताने

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व