Zee Entertainment शेअर ५.१७% वाढला 'या' कारणांमुळे इतर मिडिया शेअर्समध्येही उसळी कायम

मोहित सोमण:सकाळच्या सत्रात झी एंटरटेनमेंट कंपनीचा शेअर ५.१७% उसळला आहे. सकाळी सत्र सुरवातीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती जी ६% पर्यंत पोहोचली होती. सकाळी ११.३८ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्सने ५.१७% उसळी घेतली आहे. खरं तर झी एंटरटेनमेंट कठीण काळातुन मार्गक्रमण करत आहे. असमाधानकारक व मिश्र निकाल तसेच टेक्निकलमध्ये कमकुवतपणा अशा कारणांमुळे झी एंटरटेनमेंट शेअर्समध्ये घसरण सुरू होती. आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील मिडिया निर्देशांकात वाढ झाली आहे. झी एंटरटेनमेंट शिवाय टीव्ही १८, पीवीआर, सारेगामा इंडिया, नेटवर्क १८ या समभागात (stocks) मध्ये वाढ झाली आहे.मात्र कंपनीच्या निकालानंतर कंपनीवर कुठलीही थकबाकी अथवा कर्ज नसल्याने स्पष्ट झाल्याने कंपनीच्या शेअरला पुन्हा एकदा आज चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय कंपनीने कर्नाटकात झी पॉवर नावाची नवी वाहिनी सुरू केली. कंपनीच्या व्यवस्थापकांकडून केलेल्या कंपनीच्या आगामी सकारात्मक भूमिकेच्या स्पष्टीकरणामुळे गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समध्ये आज चांग ला प्रतिसाद दिला आहे.


या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात (Net Profit) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ७% नुकसान झाले. ज्यामुळे निव्वळ नफा १५४.२६ कोटींवर पोहोचला होता. कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाईत EBITDA) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) मध्ये १२% घसरण झाली. कंपनीच्या मार्जिनमध्ये १३.१% घसरण झाली होती. कंपनीच्या महसूलात (Revenue) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १४% घसरण झाली होती. गेल्या एक महिन्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. मागील महिन्यात कंपनीचा शेअर ७.८५% कोसळला होता आज मात्र शेअर्समध्ये वाढ झाली आहे.या आव्हानांना तोंड देत झी एंटरटेनमेंट कमी कर्ज ते इक्विटी गुणोत्तर आणि स्पर्धात्मक किंमत-ते-पुस्तक मूल्य (Price to book Equity) राखले आहे जे तिच्या समकक्षांच्या तुलनेत भविष्याती ल आकर्षक मूल्यांकन दर्शवते. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात कंपनीचा मोठा बाजार हिस्सा आहे, जो उद्योग विक्रीत महत्त्वपूर्ण योगदान देतो.

Comments
Add Comment

What is E-Bond : आजपासून 'कागदी बाँड' हद्दपार! महसूलमंत्र्यांच्या निर्णयामुळे ई-बॉण्डची एन्ट्री; वाचा काय आहे ई-बॉण्ड?

मुंबई : महाराष्ट्रातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला

Stock Market: सकाळच्या सत्रात आजही शेअर बाजार गडगडले ! बँक निर्देशांकांने सावरले सकाळची 'अशी' आहे परिस्थिती

मोहित सोमण : सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सत्राच्या सुरुवातीलाच शेअर बाजार

रशियाच्या दोन मोठ्या निर्णयांमुळे भारताचा फायदा

मॉस्को : भारत रशियातून करत असलेल्या आयातीत वाढ झाली आहे. वाजवी दरामुळे भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई