करचुकवेगिरी प्रकरणात दोन जणांना अटक ३० कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक

  24

मुंबई : महाराष्ट्र जीएसटी विभागाने देवरा एक्झिम एलएलपी या फर्मचे भागीदार मेहुल जैन व ऑपरेटर कमलेश जैन यांना ३० कोटी ५२ लाख रुपयांच्या करचुकवेगिरी प्रकरणात अटक केली. आरोपींनी चुकीची इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) वजावट घेतल्यामुळे शासनाची महसूल हानी झाली. न्यायालयाने त्यांना ४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.


कारवाईदरम्यान व्यापाऱ्याने चुकीची इनपुट टॅक्स क्रेडिट  वजावट केल्यामुळे शासनाची महसूल हानी झाल्याचे आढळून आले. राज्यकर सहआयुक्त संजय पवार आणि  उपायुक्त स्वप्नाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  सतीश पाटील, शरदचंद्र पोहनकर, भूपेन्द्र वळवी, मनोहर कनकदंडे यांनी ही कारवाई केली.


संबंधित आरोपी करदात्याची कृती महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा, २०१७ व संबंधित नियमांचे सरळ उल्लंघन आहे. अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी, मुंबई यांनी आरोपींना ०४ सप्टेंबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभाग आधुनिक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून व इतर शासकीय विभागांशी समन्वय साधून कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर सतत लक्ष ठेवत आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वे मुख्य व ट्रान्सहार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नाही

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत येत्या रविवारी मुख्य व ट्रान्सहार्बर उपनगरीय विभागांवर विविध

बाळासाहेबांचे विचार सोडल्याने तुम्हाला कामगारांनी नाकारले

शिवसेना उपनेते संजय निरुपम यांची उबाठावर टीका मुंबई : सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडणारे आणि वारंवार भूमिका

प्रभादेवीतील ब्लिंकिटचे बेकायदेशीर 'वेअरहाऊस' बंद!

मुंबई: 'ब्लिंकिट' या 'क्विक-डिलिव्हरी' (quick-delivery) कंपनीने प्रभादेवीतील एका निवासी उंच इमारतीच्या तळघरात चालणारे एक

मुंबईच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा!

मुंबई: 'एन्व्हायर्नमेंट स्टेटस रिपोर्ट' २०२४-२५ नुसार, बीएमसीच्या जल प्रयोगशाळेत केलेल्या तपासण्यांमध्ये असे

'विक्रोळी उड्डाणपुला'ची दुरुस्ती होणार!

मुंबई: 'बृहन्मुंबई महानगरपालिके'च्या पूल विभागाच्या एका पथकाने नुकत्याच उद्घाटित झालेल्या विक्रोळी रेल्वे

Monsoon: राज्यासह देशभरात २७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने जोरदार झोडपले होते. त्यानंतर काहीसा