Cyber Fraud: ६० कोटींची सायबर फसवणूक! ९४३ बँक खात्यांचा वापर, १२ आरोपींना ठोकल्या बेड्या

  46

देशातील सर्वात मोठ्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटपैकी एक घटना 


मुंबई: मुंबई पोलिसांनी एका मोठ्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. या फसवणुकीमध्ये एका जोडप्यासह १२ जणांना अटक करण्यात आली आहे. यासाठी संबंधित आरोपींनी बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करून देशभरातील अनेक लोकांची फसवणूक केली आहे. ज्यामध्ये तब्बल  ६०.८२ कोटी रुपये लांपास केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या मते, आरोपींनी बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करून ही फसवणूक केली. सदर कारस्थानासाठी संबंधित आरोपींनी तब्बल ९४३ बँक खात्याचा वापर केल्याची माहिती सूत्रकडून मिळाली आहे. , त्यापैकी १८० खाती फसवणुकीसाठी वापरण्यात आली आहे. ही टोळी डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाइन शॉपिंग फसवणुकीत  बिलंदर होती.


वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने १२ ऑगस्ट रोजी कांदिवली परिसरात छापा टाकला आणि पाच आरोपींना अटक केली. तपासात असे दिसून आले की या टोळीने आतापर्यंत ९४३ बँक खाती खरेदी केली आहेत, त्यापैकी १८० खाती फसवणुकीसाठी वापरली गेली. आरोपी ७ ते ८ हजार रुपयांना बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करायचे आणि नंतर डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन शॉपिंग आणि शेअर ट्रेडिंग फसवणूक यासारख्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा वापर करत असत.



महाराष्ट्रातच १०.५७ कोटी रुपयांची फसवणूक


या फसवणूकीच्या मुद्द्यावर बोलताना, मुंबई पोलिसांचे उपायुक्त राज तिलक रोशन म्हणाले की, ही टोळी गेल्या वर्षापासून देशभरातील लोकांना फसवण्यासाठी सक्रिय होती. आरोपींनी महाराष्ट्रातच १०.५७ कोटी रुपयांची फसवणूक केली, तर मुंबई शहरातच त्यांनी १.६७ कोटी रुपयांची सायबर फसवणूक केली. उर्वरित रक्कम इतर राज्यातील लोकांची फसवणूक करत हडप करण्यात आली.



१२ सायबर फसवणूक करणाऱ्यांना अटक


पोलिसांच्या तपासात असेही समोर आले आहे की टोळीतील काही आरोपी त्यांचे बँक खाती आणि सिम कार्ड विकून प्रचंड पैसे कमवत होते. टोळीचे नेते त्यांचा ऑनलाइन फसवणुकीत वापर करत होते. आतापर्यंत पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे आणि अनेक बँक खाती गोठवण्यात आली आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की हे देशातील सर्वात मोठ्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटपैकी एक आहे आणि या नेटवर्कशी संबंधित आणखी लोकांचा शोध अद्याप सुरू आहे.

Comments
Add Comment

प्रभादेवीतील ब्लिंकिटचे बेकायदेशीर 'वेअरहाऊस' बंद!

मुंबई: 'ब्लिंकिट' या 'क्विक-डिलिव्हरी' (quick-delivery) कंपनीने प्रभादेवीतील एका निवासी उंच इमारतीच्या तळघरात चालणारे एक

मुंबईच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा!

मुंबई: 'एन्व्हायर्नमेंट स्टेटस रिपोर्ट' २०२४-२५ नुसार, बीएमसीच्या जल प्रयोगशाळेत केलेल्या तपासण्यांमध्ये असे

'विक्रोळी उड्डाणपुला'ची दुरुस्ती होणार!

मुंबई: 'बृहन्मुंबई महानगरपालिके'च्या पूल विभागाच्या एका पथकाने नुकत्याच उद्घाटित झालेल्या विक्रोळी रेल्वे

करचुकवेगिरी प्रकरणात दोन जणांना अटक ३० कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक

मुंबई : महाराष्ट्र जीएसटी विभागाने देवरा एक्झिम एलएलपी या फर्मचे भागीदार मेहुल जैन व ऑपरेटर कमलेश जैन यांना ३०

Monsoon: राज्यासह देशभरात २७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने जोरदार झोडपले होते. त्यानंतर काहीसा

जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना, उपक्रम व अभियानांची अंमलबजावणी करीत असते. या