एलविश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला एन्काउंटरनंतर अटक


फरीदाबाद: यूट्यूबर आणि 'बिग बॉस ओटीटी २' विजेता एलविश यादवच्या गुरुग्राममधील घरावर गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीला फरीदाबाद क्राइम ब्रांचने एका चकमकीनंतर (एन्काउंटर) अटक केली आहे. इशांत उर्फ इशू गांधी असे या आरोपीचे नाव असून, पोलिसांच्या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



नेमकं काय घडलं?


फरीदाबाद क्राइम ब्रांचला इशांतच्या लपून बसल्याची माहिती मिळाली होती.


पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांना पाहताच इशांतने त्यांच्यावर स्वयंचलित पिस्तूलने अंदाधुंद गोळीबार केला.


प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला, ज्यात इशांतच्या पायाला गोळी लागली. यामुळे तो जागेवरच खाली पडला आणि त्याला अटक करण्यात आली.



एलविशच्या घरावर हल्ला:


गेल्या १७ ऑगस्ट रोजी यूट्यूबर एलविश यादवच्या गुरुग्राममधील घरावर काही हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हेल्मेट घातलेले व्यक्ती त्याच्या घराबाहेर येऊन सुमारे २४ राऊंड गोळ्या झाडताना दिसले होते. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. हिमांशू भाऊ गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. एलविश यादवने सट्टेबाजीच्याप्सची जाहिरात केल्यामुळे अनेक घरांची वाताहत झाल्याचा आरोप करत हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. या घटनेनंतर एलविश यादव आणि त्याच्या कुटुंबीयांना हरियाणा पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती.



इशांतच्या अटकेनंतर पोलीस आता या प्रकरणातील त्याच्या इतर साथीदारांचा आणि या हल्ल्यामागे असलेल्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.






Comments
Add Comment

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा