Friday, August 22, 2025

बैलपोळानिमित्त बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

बैलपोळानिमित्त बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
जालना: राज्यात बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत असताना जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैलपोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या एका १४ वर्षीय मुलाचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जालन्यातील परतुर तालुक्यातील खांडवीवाडी शिवारात बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला ही दुर्दैवी घटना घडली आहे. सुरज कदम असं मयत मुलाचे नाव आहे. बैलपोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी सुरज आपल्या काकासोबत गावाजवळ असणाऱ्या खदानीवर गेला होता. त्यांच्यासोबत गावातील अनेकजण बैल धुण्यासाठी आले आले होते. मात्र सगळे बैल धुण्यात मग्न असताना, सूरजचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment