जगायचं कुणासाठी?

  19

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य

माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. मोठा होत असताना घरी, शाळेत, मित्रमैत्रिणींच्या सहवासात तो घडत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेत असतो, त्याच जोडीने त्याचे शिक्षणही सुरू असते. शिक्षण झाले की, मग नोकरी, संसार, मुले-बाळे यांच्याबरोबर सुखदुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो. पोटाची खळगी भरण्यासाठी, जीवनात जे हवे ते मिळविण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो आणि असे होता होता एक दिवस त्याचा जीवनप्रवास संपतो.

असं म्हणतात, मनुष्य ज्या दिवशी जन्माला येतो त्याच दिवशी त्याचा मरण दिवस ठरलेला असतो. फक्त आपल्याला तो माहीत नसतो इतकेच. पण असे असूनही जन्मल्यापासून ते मरेपर्यंतचा काळ त्याने कसा व्यतीत केला हे महत्त्वाचे आहे. मेल्यानंतर पृथ्वीतलावरचं माणसाचं अस्तित्व कायमचंच संपुष्टात येतं. आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त काही महिन्यांपुरतीच असते. कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच. मी, माझं, माझं कुटुंब, माझा पैसा, गाडी, बंगला, दागदागिने यातच माणूस गुरफटलेला असतो; परंतु म्हणून माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही. त्याच्या मनाची श्रीमंती महत्त्वाची. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो. पैसा, गाडी, बंगला आणि त्यामुळे मिळणारा मानमरातब ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत. यातील प्रत्येक वस्तू ही फक्त आणि फक्त तुमच्यापुरती आणि तुमच्या कुटुंबापुरती उपयोगाची आहे. त्याचा इतरांना काय उपयोग? तुम्ही जिवंत असताना समाजासाठी, गरजवंतांसाठी काय केले? तुम्ही ज्या काही गोष्टी मिळवल्या त्यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. सोबत नेता ते तुमचं कर्म, तुमच्याप्रती असलेली समाजाची आपुलकी आणि समाजातील लोकांनी वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हीच आयुष्यभराची कमाई असते. मग... जगावं तरी कुणासाठी? तर... जगावं तर ते समाजासाठी... जेव्हा तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करता तेव्हा तुमचे खरे जगणे सुरू होते. समाजाचा विचार करून जगणं म्हणजे आयुष्य. एखादा माणूस पैशाने श्रीमंत आहे; परंतु समाजासाठी त्याने काहीही कर्तव्य बजावली नाहीत आणि त्याच्या मृत्यूनंतर समाज त्याची आठवण काढत आहे, हे शक्य आहे का? तुम्ही स्वार्थी होतात, स्वत:पुरते जगणारे होतात तर समाज तुमची का आठवण काढेल? परंतु एखादा माणूस श्रीमंत आहे आणि त्याने गोरगरिबांसाठी अन्नपाण्याची, त्यांच्या राहण्याची किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे आणि काही वर्षांनी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला की हाच समाज त्याची निश्चित आठवण काढल्याशिवाय राहणार नाही. कारण हा व्यक्ती समाजासाठी जगलाय, त्या व्यक्तीमुळे गोरगरिबांनी सुखाचे चार क्षण अनुभवले आहेत. या आपल्या महाराष्ट्रात अनेक थोर संत होऊन गेले. त्यांनी समाजाला सन्मार्गाची, त्यांच्या योग्य विचारांची शिकवण देऊन समृद्ध केले आहे. त्यामुळे आजही अनेक संतांना लोक पूजतात. उदा. गाडगेमहाराज त्यांनी समाजासाठी काय केले नाही. त्यांना जे जे म्हणून शक्य होते ते सर्व त्यांनी केले. मी एका ठिकाणी वाचले आहे की, गाडगेमहाराज एका पायात चप्पल आणि एक पाय अनवाणी असे. त्यांना याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, जे लोक अनवाणी आहेत त्यांचे दु:ख मला कळले पाहिजे. आपण नक्कीच त्यांच्याइतका महान विचार करू शकत नाही. आपण नक्कीच संत किंवा महान व्यक्तिमत्त्व नाही; परंतु आपल्याला जे नको आहे किंवा जे आहे त्यातील काही भाग जर गरजवंताला दिल्यास तो ही मदत आयुष्यभर विसरणार नाही.

आपण जन्माला येतो तेव्हाच कुटुंबीयांप्रमाणेच मातृभूमीचे, देशाचे, समाजाचे आपल्यावर ऋण असतात ते फेडणे आपले कर्तव्य असते. त्यामुळे फक्त स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठीच न जगता समाजासाठी जगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

Horoscope: कर्क राशीत शुक्राचे गोचर, या तीन राशींसाठी नशिबाचे दार उघडणार

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार व्यक्तीच्या आयुष्यात अनेक बदल घडत असतात. सुख,

उत्सव गणेशाचा, ठेवा संस्कृतीचा...

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव फार मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. सार्वजनिक

भारतीय ऋषी - वसिष्ठ

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी आपल्या हजारो सैनिकांच्या खाण्यापिण्याची, आरामाची इतकी तत्पर व्यवस्था करणे,

आनंदाचा शोध

सद्गुरू वामनराव पै हिंदू संस्कृतीने देव सर्वत्र भरला आहे ही संकल्पना मांडलेली असली तरी प्रत्यक्षात त्याचा

‘तिथे पूजा जन्मते’

ऋतुराज : ऋतुजा केळकर ‘पूजा’ एक शब्द, एक श्वास... शब्दांशिवाय चालणाऱ्या पूजेस, विखुरलेल्या मनाला देवाचा मूक स्वीकार

बुधचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन, 'या' राशींसाठी ३० ऑगस्ट ठरणार शुभ

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन व्यक्तीच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडते. ३०