प्रतिनिधी: एलोन मस्क यांच्या स्टारलिंकने (Starlink) भारतीय आधार कार्ड मंडळ असलेल्या युआयडीएआय (Unique Identification Authority of India UIDAI) नियामकाशी भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीला यापूर्वी भारतात सॅटला ईट आधारित फास्ट इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी सरकारकडून हिरवा कंदील मिळाला होता. आता ग्राहकांची पडताळणी व नोंदणी करण्यासाठी स्टारलिंकने हा निर्णय घेतला आहे. 'भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) उपग्रह-आधारित इंटरनेट प्रदा त्या (Provider) स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडला ऑनबोर्ड केले आहे. स्टारलिंक ग्राहक पडताळणीसाठी आधार प्रमाणीकरण वापरेल, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि खूप सोपी होईल' असे कंपनीने बुधवारी एका निवेदना त म्हटले होते.
तसेच या निवेदनात,' स्टारलिंकचे आधार प्रमाणीकरणाशी संलग्नीकरण हे एक शक्तिशाली सहकार्य दर्शवते: जागतिक उपग्रह तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करणारे भारताचे विश्वासार्ह डिजिटल ओळख. आधार ई-केवायसी वापरकर्त्यांना अखंडपणे ऑनबोर्डिंग सुल भ करेल, घरे, व्यवसाय आणि संस्थांना हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करताना नियामक आवश्यकतांचे पालन सुनिश्चित करेल' असेही त्यामध्ये म्हटले गेले होते. माहितीनुसार स्टारलिंक सॅटलाईट कम्युनिकेशन कंपनीला सब ऑथेंटिकेशन (Sub Authentication) व सब ईकेवायसी एजन्सी (Sub eKYC) संस्था म्हणूनही प्रमाणित केले गेले आहे. याविषयी बोलताना, ' सेवांचा भारतातील केवळ २० लाख ग्राहकांना सेवा देणार असल्याने विद्यमान टेलिकॉम ऑपरेटर्सवर परिणाम होणार नाही' असे यावेळी बीएसएनएलच्या कार्यक्र मात बोलताना स्थानिक टेलिकॉम ऑपरेटर्सबद्दलच्या चिंता दूर करताना, ग्रामीण विकास आणि दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनीम्हटले आहे.
स्ट्रीमिंग, गेमिंग, व्हिडिओ कॉल आणि इतर ऑनलाइन क्रियाकलापांसाठी ब्रॉडबँड इंटरनेट प्रदान करण्यासाठी ते कमी पृथ्वीच्या कक्षेचा वापर करते पृथ्वीपासून ३५७८६ किलोमीटरवर स्थित भूस्थिर उपग्रहांवर अवलंबून असलेल्या पारंपारिक उपग्रह इंटरनेटच्या विपरीत, स्टारलिंक त्याच्या सेवांसाठी वेगळ्या दृष्टिकोनाचा अवलंब करणार आहे असे यापूर्वीच स्टारलिंकने म्हटले होते.या इंटरनेट सेवेतील मोठ्या परिवर्तनामुळे आयटी क्षेत्रात रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.