हृदयविकाराचा इशारा देतात 'ही' लक्षणं – दुर्लक्ष केलं तर जीवावर बेतू शकतं !

मुंबई: आजकाल दिवसेंदिवस बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका वाढत आहे. अनियमित झोप , बदलता आहार , कामाचा तणाव ही हृदयविकाराची काही महत्वाची करणे आहेत . हृदयविकाराचा झटका हा कोणत्याही वयाच्या व्यक्तीला येऊ शकतो. मात्र, अनेकदा हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीरात काही गंभीर लक्षणे दिसतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे ही लक्षणे वेळीच ओळखणे आणि योग्य वेळी वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.


तज्ञांच्या मते, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी दिसणारी लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असू शकतात. काही लक्षणे काही मिनिटांसाठी दिसतात, तर काही लक्षणे अनेक दिवस आधीपासून हळूहळू दिसू लागतात.


हृदयविकाराच्या झटक्याची पूर्व लक्षणे


छातीत दुखणे किंवा अस्वस्थता:
हे सर्वात सामान्य लक्षण आहे. छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला दाब, जडपणा किंवा पिळवटल्यासारखी वेदना जाणवणे. काहीवेळा ही वेदना तीव्र नसते पण अस्वस्थ वाटू शकते. अनेकदा लोक याला अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करतात.


शरीराच्या विविध भागांमध्ये वेदना:
छातीत सुरू झालेली वेदना खांदा, हात (विशेषतः डावा), पाठ, मान, जबडा किंवा दातांमध्ये पसरू शकते. काहीवेळा पोटातही दुखते, ज्यामुळे मळमळ किंवा उलट्यांचा त्रास जाणवतो .


श्वास घेण्यास त्रास होणे:
धाप लागणे, श्वास घेताना त्रास होणे किंवा दम लागल्यासारखे वाटणे हे छातीतील वेदनेसह किंवा त्याशिवायही होऊ शकते. थोड्याश्या शारीरिक श्रमानंतरही जास्त थकवा आणि दम लागणे हे हृदयाच्या कमकुवतपणाचे लक्षण असू शकते.


अचानक घाम येणे:
कोणत्याही कारणाशिवाय अचानक खूप घाम येणे, विशेषतः थंड घाम येणे हे हृदयविकाराच्या धोक्याचे संकेत असू शकते.


चक्कर येणे किंवा अस्वस्थ वाटणे :
अचानक चक्कर येणे, डोके हलके वाटणे किंवा बेशुद्ध होणे हे गंभीर लक्षण आहे. कारण हे मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्याचे दर्शवते.


जास्त थकवा जाणवणे:
साधे काम करतानाही खूप थकवा जाणवणे किंवा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात थकवा येणे हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे पूर्व-लक्षण असू शकते.


कोणती काळजी घ्याल ?


हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळेवर उपचार मिळाल्यास मोठा धोका टाळता येऊ शकतो. तसेच, नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार आणि व्यायाम यामुळे हृदयविकाराचा धोका कमी करता येतो.


हृदयविकार टाळण्यासाठी दररोज फळे, भाज्या, कमी चरबीयुक्त पदार्थ आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे . दररोज नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे .


Comments
Add Comment

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे

योग व्हावी जीवनशैली

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके जीवनशैली म्हणजे जीवन जगण्याची पद्धत. जगण्याची ही पद्धत आपल्या आयुष्याचा अविभाज्य

करडईची भाजी

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे डिसेंबरची थंडी म्हणजे फक्त हवामानातला बदल नाही; ती आठवणींची चाहूल असते. सकाळी

समाजकार्य हेच ईश्वरकार्य

कर्तृत्ववान ती राज्ञी : उज्वला करंबळेकर “समाज हा आपलाच आहे, त्याच्या भल्यासाठी केलेले कार्य हेच खरे ईश्वरकार्य"

नैसर्गिक प्रसूती

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील नैसर्गिक प्रसूती म्हणजे कोणतीही शस्त्रक्रिया न करता योनीमार्गातून बाळ जन्माला