ज्युपिटर वॅगन्स शेअरची १२% उसळी तर रेलटेल ३% वाढला 'या' कारणामुळे

  73

मोहित सोमण: कालपासून रेल्वेशी संबंधित रेलटेल (RailTel), ज्युपिटर वॅगन्स (Jupiter Wagons) या दोन समभागांवर (Stocks) बाजाराचे लक्ष लागले. आज दोन्ही समभागात अपेक्षित वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना आज सकाळच्या चांगला परतावा (Retu rns) मिळत आहे. सकाळी सत्र सुरू होतानाच ज्युनिअर वॅगन्सचा समभाग १२% पर्यंत उसळला होता. सकाळी ११.०१ वाजता कंपनीच्या समभागात ११.८१% वाढ झाली आहे‌. तर रेलटेल कंपनीचा समभाग सकाळी सत्र सुरू होतानाच ३% पर्यंत उसळला होता.स काळी ११.०१ वाजेपर्यंत कंपनीच्या समभागात २.११% वाढ झाली आहे. प्रामुख्याने ही वाढ दोन्ही कंपन्याना नव्या ऑर्डर मिळाल्याने झाली आहे.


उपलब्ध माहितीनुसार, ज्युपिटर वॅगन्सला नवी ऑर्डर मिळाल्याचे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत म्हटले. कंपनीने म्हटले आहे की,' कंपनीचीच असूचीबद्ध (Unlisted) कंपनी, ज्युपिटर तत्रवागोंका रेलव्हील फॅक्टरीला(Jupiter Tatravagon ka Railwhwel Factory) कंपनीला ५३७६ व्हीलसेटचे कंत्राट वंदे भारत ट्रेनसाठी मिळाले असून अंदाचे २१५ कोटींची ही ऑर्डर आहे ' असे म्हटले गेले आहे. १९ ऑगस्टला स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये संबंधित माहिती कंपनीने दिली ज्यामुळे कंपनीच्या सम भागात (शेअर्समध्ये) आज तेजी पहायला मिळाली. बीएसईत सकाळी कंपनीच्या शेअर्समध्ये तर १२.६२% उसळी पहायला मिळाली होती. ज्युपिटर वॅगन्स कंपनी ही रेल्वे उत्पादनांशी संबंधित आहे. ती कंपनी रेल्वेसाठी फ्राईट कार, पॅसेंजर कोच, व इतर उत्पादने बनवते. तसचे कंपनी व्यवसायिक वाहने, मरिन कंटेनर, व इतर तत्सम उत्पादनांशी संलग्न आहे.


कंपनी तिच्या एकात्मिक उत्पादन सुविधा (Integrated Production) आणि बॅकवर्ड-इंटिग्रेटेड दृष्टिकोनासाठी ओळखली जाते, ज्यामध्ये फाउंड्री आणि कोल्ड रोल-फॉर्मिंग मिल्सचा समावेश आहे. ज्युपिटर वॅगन्स तिच्या उपकंपनी, ज्युपिटर इलेक्ट्रिक मोबिलि टीद्वारे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये देखील विस्तार करत आहे. याशिवाय रेलटेल कंपनीच्या समभागातही बाजार सुरू होताच ४% पर्यंत वाढ झाली होती. सकाळी ११.१७ वाजेपर्यंत कंपनीच्या समभागात २.१०% वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने कंपनीला मिळालेल्या नव्या दोन ऑर्डरमुळे झाली आहे. एक १५.४२ कोटीची दुसरी ३४.९९ कोटींची ऑर्डर मिळाल्याने कंपनीचा शेअर आज फोकसमध्ये होता. या समभागातही गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे.


कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार,रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की,त्यांना ओडिशा सरकारच्या उच्च शिक्षण विभागाकडून १५.४२ कोटी रुपयांच्या (करासह) ऑर्डर मिळाली आ हे. उच्च शिक्षण विभागासाठी महाविद्यालयांसाठी सीएमएस-आधारित द्विभाषिक वेबसाइट्सच्या डिझाइन आणि विकासासाठी हा आदेश आहे.' तर एसडीसीच्या केरळ राज्य माहिती तंत्रज्ञान मिशनकडून रेलटेलला दुसरा आदेश (Work Order) कर वगळून ३४ ९९८५६२८ रुपयांच्या प्रकल्पांसाठी प्राप्त झाला आहे. कामाचा आदेश (Work Order) १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अंमलात आणण्याचे नियोजन आहे असे कंपनीने म्हटले आहे. हे काम पाच वर्षांच्या कालावधीसाठी राज्य डेटा सेंटर्सच्या ऑपरेशन आणि देखभाली साठी डेटा सेंटर ऑपरेटरशी संबंधित आहे. हा आदेश १८ ऑगस्ट २०३० पर्यंत अंमलात आणला जाऊ शकतो.

Comments
Add Comment

‘खड्डे असतील, तर टोल नाही’

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात कार्यवाहीसाठी अभ्यास सुरू मुंबई : केरळ राज्यातील एका

पक्षाच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार

अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा मुंबई : मला नागपुरात उपमुख्यमंत्रीपदाचा विजयगड बंगला

मुंबईकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये सध्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या

मिठी नदीच्या घोटाळ्यातील तिसरा आरोपी अटकेत!

मुंबई : ६५ कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ काढण्याच्या घोटाळ्याच्या चालू तपासात एक मोठी प्रगती झाली आहे. मुंबई

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप

लोकसभेत १२ तर राज्यसभेत १५ विधेयके मंजूर महिनाभरात फक्त ३७ तास चर्चा नवी दिल्ली : महिनाभर चाललेल्या अधिवेशनात

बोईसर MIDC मध्ये वायू गळती, ४ कामगारांचा मृत्यू, तर अनेकांची प्रकृती चिंताजनक

पालघर: बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात वायुगळती झाल्याची घटना घडली आहे. या वायू गळतीमुळे ८ कामगारांना बाधा