Horoscope: कर्क राशीत शुक्राचे गोचर, या तीन राशींसाठी नशिबाचे दार उघडणार

  67


मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार व्यक्तीच्या आयुष्यात अनेक बदल घडत असतात. सुख, समृद्धी, प्रेम आणि वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह मानला जाणारा शुक्र ग्रह, २१ ऑगस्ट, २०२५ रोजी मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत याच राशीत राहील. या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्व १२ राशींवर होणार असला तरी, काही राशींसाठी हा काळ विशेषतः शुभ फलदायी ठरू शकतो.



मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल. घर आणि कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. मालमत्ता खरेदी किंवा नवीन वाहन खरेदीचा योग आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे योग असून, आर्थिक स्थिती मजबूत होईल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.



कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे गोचर लाभदायक ठरेल. करिअरमध्ये प्रगती होईल आणि नवीन संधी मिळतील. व्यावसायिकांना चांगला नफा होईल. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल. नवीन लोकांशी संबंध प्रस्थापित होतील, जे भविष्यात फायदेशीर ठरतील. आर्थिक आवक वाढेल.



धनु रास (Sagittarius)


धनु राशीसाठी हा काळ खूपच शुभ सिद्ध होईल. तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठे बदल घडू शकतात. उद्योजकांना अपेक्षित यश मिळेल. कर्जमुक्तीचे योग आहेत आणि पैशांची आवक वाढेल. कुटुंब किंवा मित्रांसोबत सहलीचे नियोजन करू शकता. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे. वैवाहिक आणि प्रेम जीवनात गोडवा वाढेल.


Comments
Add Comment

गणपतीसाठी कोकणात जाताय तर ही बातमी तुमच्यासाठी, 23 ते 28 ऑगस्ट या कालावधीत हा मार्ग अवजड वाहनासाठी बंद

गणपती म्हटलं की कोकणाकडे जाणाऱ्यांची ओढ लागते. राज्यातून विविध ठिकाणी गेलेले चाकरमानी गणपतीला आपल्या गावाकडे

बोरघाट महामार्ग अवजड वाहतुकीसाठी बंदी

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना अलिबाग : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ४८) बोरघाट या महामार्गावर

राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती

वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी मुंबई : राज्यात सप्टेंबरपासून १५ हजार ६३१ पोलीस शिपाई, चालक,

सरकारी नोकरीतील १ हजार १८९ ‘लाडक्या बहिणी' संकटात

बोगस लाभार्थ्यांना वगळण्यासाठी महिला व बालकल्याणची विशेष पडताळणी मोहीम मुंबई : गरीब आणि गरजू महिलांना

‘वराह भगवान‘जयंती राज्यभरात साजरी व्हावी!

मंत्री नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी मुंबई: वराह देवाचे हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे,

तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं

आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यापैकी