‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

का ही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशा कलाकृतींच्या यादीतील ‘घरत गणपती’ हा चित्रपट म्हणता येईल. या लोकप्रिय चित्रपटाच्या स्मरणरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पुन्हा एकदा घेता येणार आहे. मराठी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मने जिंकणारा हा चित्रपट खास लोकाग्रहास्तव २९ ऑगस्टपासून पुन्हा चित्रपटगृहात झळकणार आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत असताना गणेशोत्सवाचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘घरत गणपती’ हा चित्रपट नवचैतन्य देणारा ठरणार आहे.


याविषयी चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर म्हणाले की, ‘अनेकदा प्रेक्षक ‘घरत गणपती’ चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला कधी मिळणार? असे विचारत होते. गणरायाच्या आशीर्वादाने त्यांची ही इच्छा पूर्ण करता येतेय याचा खूप आनंद आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची एक वेगळी मजा आहे. एक छान कौटुंबिक कथा व भारतीय संस्कृतीचे दर्शन या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. ’ पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या विद्यमाने आलेल्या 'घरत गणपती' या भव्य मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Comments
Add Comment

Aamir Khan : आमिर खानला बिश्नोई गँगच्या नावाने धमकी? सोशल मीडियावरील पोस्टमुळे खळबळ; ‘लव्ह जिहाद’चा केला उल्लेख

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या (Lawrence Bishnoi Gang) नावाने सोशल मीडियावर (Social Media) धमकी

Upcoming Hollywood Movies Releases : २०२६ मध्ये चित्रपटसृष्टीत महाधमाका! ‘स्पायडर-मॅन’पासून ‘अ‍ॅव्हेंजर्स डूम्सडे’पर्यंत मोठ्या सिनेमांची मेजवानी

हॉलीवूड (Hollywood) सिनेमांसाठी २०२६ हे वर्ष खास ठरणार आहे. क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’ (The Odyssey) या बिग बजेट

Aamir Khan On Sonam Wangchuk : 'रँचो' आणि सोनम वांगचुक यांचा संबंध नाही! आमिर खाननं '3 इडियट्स'च्या गैरसमजावर दिलं स्पष्टीकरण

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) ‘3 इडियट्स’ (3 Idiots) चित्रपटातील ‘रँचो’ (Rancho) हे पात्र प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Itha Movie : 'इठा' चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप

पुणे : तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर ( Itha Movie) यांनी आपल्या अद्वितीय कलेच्या जोरावर महाराष्ट्राच्या