बोईसर MIDC मध्ये वायू गळती, ४ कामगारांचा मृत्यू, तर अनेकांची प्रकृती चिंताजनक

पालघर: बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात वायुगळती झाल्याची घटना घडली आहे. या वायू गळतीमुळे ८ कामगारांना बाधा झाली असून, त्यामधील ४ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर इतर कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ १३ मधील मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड कंपनी दुपारच्या सुमारास वायुगळतीची दुर्घटना घडली. ज्यात सदर ठिकाणी काम करत असलेल्या ८ जणांना बाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. कामगारांची प्रकृती बिघडल्यानंतर त्या सर्वांना तातडीने नजीकच्या शिंदे या खाजगी रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले. मात्र त्यांपैकी ४ कामगारांचा मृत्यू झाला. तसेच उर्वरित कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


यापूर्वीही बोईसर तारापूर एमआयडीसीत वायुगळतीची घटना घडलेली आहे. काही महिन्यांपूर्वी कॅम्लीन फाईन सायन्सेस लिमिटेड कंपनीत वायू गळती झाल्याने ११ कामगारांना त्याची बाधा झाली. कंपनीत डायमिथाईल सल्फेटची गळती झाल्याने कामगारांना डोळे चुरचुरणे आणि जळजळ होणे यांसारख्या समस्या जाणवल्या होत्या. त्यावेळी बाधित कामगारांना  तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून, यात जीवितहानी झाल्याकारणामुळे, बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)