उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी भरला अर्ज


नवी दिल्ली : जगदीश धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी आज म्हणजेच बुधवार २० ऑगस्ट रोजी सकाळी उमेदवारी अर्ज भरला. सीपी राधाकृष्णन यांच्यासाठी २० जणांनी प्रस्तावक आणि २० जणांनी अनुमोदक म्हणून उमेदवारी अर्जावर सही केली आहे. प्रस्तावकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही सर्वात आधी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्यासह एनडीएतील निवडक घटक पक्षाच्या नेत्यांनीही प्रस्तावक म्हणून सीपी राधाकृष्णन यांच्या उमेदवारी अर्जावर सही केली आहे.





जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर देशात पुन्हा एकदा उपराष्ट्रपती निवडले जात आहेत. ही निवडणूक केवळ संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजेच राज्यसभेच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची नाही तर त्याचे निकाल येणाऱ्या वर्षांच्या संसदीय कामकाजावरही परिणाम करू शकते. उपराष्ट्रपती या पदासाठी संविधानाच्या कलम ६६ अंतर्गत निवडणूक होते. इलेक्टोरल कॉलेज म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेतील निवडून आलेले आणि नामांकित सदस्यच मतदान करतात. या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होते.


जिंकण्यासाठी उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवावी लागतात. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. उपराष्ट्रपती हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च घटनात्मक पद आहे.


या निवडणुकीत एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सीपी राधाकृष्णन यांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र विरोधात इंडी आघाडीने उमेदवार उभा केला तर निवडणूक होणार आहे. सध्या निवड बिनविरोध व्हावी यासाठी केंद्राच्यावतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह विरोधी पक्षांशी संपर्क साधत आहेत. विरोधी पक्षाकडून बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र या उमेदवारीची घोषणा अद्याप झालेली नाही.


Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे