मनुके खाण्याचे फायदे:
बद्धकोष्ठतेपासून आराम: मनुकामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. हे फायबर आतड्यांच्या कार्याला चालना देते, ज्यामुळे शौच सुलभ होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
आतड्यांचे आरोग्य: मनुकातील सॉर्बिटॉल नावाचा नैसर्गिक घटक आतड्यांमध्ये पाणी खेचून घेतो, ज्यामुळे मल मऊ होण्यास मदत होते. यामुळे सकाळी सहजपणे पोट साफ होते.
पचन सुधारते: मनुका नियमित खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाचे आरोग्य चांगले राहते.
मनुका खाण्याची योग्य पद्धत:
रात्री भिजत घाला: रात्री झोपण्यापूर्वी ५-६ मनुके पाण्यामध्ये भिजत घाला.
सकाळी खा: सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे मनुके चावून खा आणि ते पाणी प्या. यामुळे पचनक्रिया अधिक वेगाने काम करते.
केवळ मनुकेच नाही तर सुक्या मेव्यामध्ये अंजीर, खजूर आणि जर्दाळू हे सुद्धा बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर आहेत. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. मात्र, कोणत्याही उपायाचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच योग्य असते.