
एक्सप्रेसने प्रवास करायचा आहे? तर आधी हे वाचा
मुंबई: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. धुंवाधार कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण रस्ते जलमय झाले आहेत. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकलसेवा ठप्प झाली आहे.
या मुसळधार पावसाचा फटका लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही बसला आहे. पावसामुळे लांब पल्ल्याच्या १४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात पुण्याला जाणाऱ्या गाड्यांचा अधिक समावेश आहे. तसेच जालना आणि धुळ्याला जाणाऱ्या एक्सप्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच अनेक गाड्या पुणे आणि पनवेलपर्यंतच चालवल्या जात आहेत. सोलापूर, नागरकोईल, मडगाव तसेच अमरावती नाशिक रोडला जाणाऱ्या गाड्या या पुणे तसेच पनवेल स्थानकापासून चालवल्या जाणार आहेत.
रद्द झालेल्या गाड्यांची यादी
११००७ डेक्कन एक्सप्रेस (मुंबई-पुणे)
११००८ डेक्कन एक्सप्रेस (पुणे-मुंबई)
२२१०५ इंद्रायणी एक्सप्रेस (मुंबई-पुणे)
२२१०६ इंद्रायणी एक्सप्रेस (पुणे-मुंबई)
२२१२२ झेलम एक्सप्रेस (पुणे- मुंबई)
२०७०५ जालना मुंबईन जनशताब्दी एक्सप्रेस
११०११ धुळे-मुंबई एक्सप्रेस
११०१२ मुंबई- धुळे एक्सप्रेस