Mumbai Rain Update: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई:  हवामान खात्याने मुंबईतील मुसळधार पावसाबाबत दिलेला इशारा अगदी तंतोतंत खरा ठरला आहे. मुंबईत धुंवाधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर घरातच थांबा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.


मुंबई तसेच उपनगरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. हवामान खात्याने मंगळवारीही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढच्या तीन ते चार तासांत मुंबईत अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या दरम्यान, मुंबईत जोरदार पाऊस बरसणार आहे. त्यामुळे या काळात सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईतील शाळा तसेच कॉलेजना सोमवारीच सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


बंगालचा उपसागरा कमी दाबाचे पट्टा निर्माण झाल्याने मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. हा पट्टा हळूहळू गुजरातच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे मंगळवारी पावसाचा जोर मुंबईत कायम राहणार आहे. बुधवारपासून मुंबईतील पावसाचा जोर कमी होईल.


मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक सखल भागांमध्ये पाणी भरू शकते.



रेल्वे रुळांवर पाणी


मुंबईत जागोजागी पाणी भरल्याने लोकल वाहतुकीला याचा मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ४० मिनिटे उशिराने सुरू आहे तर हार्बर रेल्वेची वाहतूकही अर्धा तास उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेमार्गावरील घाटकोपर ते दादर परिसरात रेल्वे रुळांवर मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. तर माटुंगा रेल्वे स्थानकातील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन