मुंबईत जागोजागी पाणी भरल्याने लोकल वाहतुकीला याचा मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ४० मिनिटे उशिराने सुरू आहे तर हार्बर रेल्वेची वाहतूकही अर्धा तास उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेमार्गावरील घाटकोपर ते दादर परिसरात रेल्वे रुळांवर मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. तर माटुंगा रेल्वे स्थानकातील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
हवामान खात्याने मुंबईत पुढील तीन ते चार तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे सखल भागात असणारी रेल्वे स्थानकं पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. कुर्ला आणि घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्याप्रमाणावर पाणी साचल्याने प्रवाशांना स्टेशनपर्यंत पोहोचणेही अवघड झाले आहे.