
“भारताचा बेरोजगारी दर घसरला; जुलै महिन्यात ५.२% वर”
जुलै महिन्यात भारताच्या बेरोजगारी दरात लक्षणीय घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. देशाचा बेरोजगारी दर ५.६ टक्क्यांवरून कमी होऊन ५.२ टक्क्यांवर आला आहे. ग्रामीण भागातील स्थिती पाहता, १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तरुणांचा बेरोजगारी दर ४.९ टक्क्यांवरून घसरून ४.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. या घटेमागे मुख्य कारण म्हणून ग्रामीण भागात पावसाळ्यामुळे शेतामध्ये सुरू असलेली कामे दिली जात आहेत. दरवर्षीप्रमाणेच पावसाळा आणि हिवाळ्यात शेतीसंबंधित कामांमुळे मोठ्या प्रमाणात मजुरांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे ग्रामीण अर्थचक्राला गती मिळाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Mumbai Filterpada Powai : पाय घसरला आणि थेट नाल्याच्या प्रवाहात; फिल्टरपाड्यातील युवकाचा जीवघेणा प्रसंग
मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण केली आहे. अशातच पवईतील फिल्टर पाडा परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली. पवई फुलेनगर ...
"शहरी बेरोजगारीत किंचित वाढ, तरीही देशाचा बेरोजगारी दर ५.२% वर”
भारतातील बेरोजगारीच्या आकडेवारीत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये वेगवेगळे चित्र दिसून येत आहे. शहरी भागात बेरोजगारी दरात किंचित वाढ झाली आहे. जून महिन्यात शहरी बेरोजगारी दर ७.१ टक्के होता, तो जुलै महिन्यात वाढून ७.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तथापि, ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधींमुळे एकूण राष्ट्रीय बेरोजगारी दर घटला आहे. सरासरी पाहता, भारताचा बेरोजगारी दर ५.६ टक्क्यांवरून कमी होऊन ५.२ टक्क्यांवर आला आहे. या घटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जीएसटी सुधारणा; रोजगारवाढीची शक्यता
भारतातील अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. केंद्र सरकारकडून नुकतंच जीएसटीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा (GST Reform) करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या सुधारणा अमलात आल्यास देशातील व्यापाराला चालना मिळेल आणि विविध क्षेत्रांमध्ये नव्या रोजगार संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, बेरोजगारी दर आणखी खाली येऊ शकतो. दरम्यान, अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र, जीएसटी रिफॉर्मच्या निर्णयामुळे या चिंतेवर काही प्रमाणात पाणी फिरल्याचे मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात रोजगार वाढून बेरोजगारी दरात आणखी घट होण्याची शक्यता आहे.