सकाळच्या सत्रात शेअर बाजारात सनसनाटी वाढ सेन्सेक्स ११४४ व निफ्टी ३८२.७४ अंकांने उसळला बँक, ऑटो, फायनांशियल, मेटल शेअर्समध्ये तुफानी मात्र अस्थिरता कायम! 'हे' आहे सकाळचे सविस्तर विश्लेषण

  26

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात प्रचंड वाढ झाली आहे. सेन्सेक्स सकाळी सत्राच्या सुरुवातीला ११४४.७५ अंकांने व निफ्टी ५० सत्राच्या सुरुवातीला ३८२.५० अंकाने उसळल्याने शेअर बाजारात सनसनाटी वाढ झाली आहे. बँक, ऑटो, फायनांशियल सर्व्हिसेस, एफएमसीजी, मेटल या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या वाढीने बाजारात रॅली झाली आहे. सकाळी जवळपास सेन्से क्स १.३८%, निफ्टी १.५५ अंकाने उसळल्याने शेअर बाजारात जोरदार वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. सकाळी ७.२३ वाजता गिफ्ट निफ्टीत तुफानी आली होती. थेट १.१८% उसळी घेतल्याने आज शेअ र बाजारातील वाढीचे संकेत मिळतच होते. जागतिक घडामोडींचा परिणाम गिफ्ट निफ्टीत दिसला. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ८४८.७८ अंकांची व बँक निफ्टीत ७८९.०५ अंकांची वाढ झाल्याने नि र्देशांक पातळी जोरदार वाढली आहे. तिचं परिस्थिती आज सुरूवातीच्या कलात मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये कायम आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.३१%,१.११% वाढ झाली आ हे.निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.४३%,१.१५% वाढ झाली आहे.


निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच मोठी रॅली झाली आहे. सकाळी सुरुवातीला तेल व गॅस (०.१६%) मध्ये झालेली किरकोळ वाढ बघता इतर समभागात मोठी रॅली झाली. सर्वाधिक वाढ ऑटो (४.३४%), रिअल्टी (२.३५%), फायनांशियल सर्व्हिसेस (२.०८%), पीएसयु बँक (१.०२%), मेटल (१.५७%), एफएमसीजी (१.६४%) समभागात झाली आज घसरण कुठल्या ही क्षेत्रीय निर्देशांकात झाली नाही. सकाळच्या सुरुवातीच्या कलात निफ्टी अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) ४.१४% उसळल्याने अखेरपर्यंत टिकेल का हा देखील प्रश्न उपस्थित होतो


रशिया व युएस यांच्यातील समिटमध्ये अनेक अंशी सकारात्मक चर्चा झाली. परंतु निर्णय अथवा निष्कर्षावर चर्चा आली नाही. दुसरीकडे गुंतवणूक आगामी युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि यु क्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात चर्चा होणार आहे. रशिया व युएस यांच्यातील तोडगा निघाला नसला तरी सरकारात्मक झाली आहे. रशियाने 'काही' अटीवरती सिझफायर (युद्धबं दी) तयारी दर्शवली आहे त्यावर निर्णय बाकी आहे. रशियाने युद्धबंदी बदल्यात युक्रेनचा डोनबास, लुहांसक या भागांवर नियंत्रण मागून तो भाग रशियात सामील करण्याची मागणी केली आहे. भा रतीय शेअर बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना भारतात चर्चेसाठी निमंत्रण दिले होते ते भारतात येणार आहे यावेळी भारत - चीन सीमा सुरक्षा याविषयी विस्तृत चर्चा अपेक्षित आहे. कारण टॅरिफच्या मुद्यावर चीन भारत जवळ आले होते. त्याचा नव्याने काय परिणाम होईल ते आगामी काळात स्पष्ट होईल. काही कंपन्यांचे तिमाही निकालही शेअर बाजारात प्रभावी ठरू शकतात.


आज केईसी इंटरनॅशनल, टोरंट फार्मास्युटिकल, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल, वोडाफोन आयडिया, आयनॉक्स वाईंड, आर्य आय एफएल फायनान्स, जीएफएल फायनान्स, इज माय ट्रीप, वेदांता या शेअर्समध्ये मोठि हालचाल होणे अपेक्षित आहे. जागतिक बाजारपेठेबाबत विचार केल्यास बर्कशायर हॅथवेने आपला हिस्सा वाढवल्याच्या बातमीनंतर युनायटेडहेल्थच्या शेअर्समध्ये वाढ झाल्या ने, इंट्राडे उच्चांक गाठल्यानंतर युएस शेअर बाजारातील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी शुक्रवारी उच्चांकावर पोहोचली आणि विक्रमी पातळीवर बंद झाली.व्यापक बाजारपेठांमध्ये मिश्र आर्थिक डेटामुळे घसरण झाली असून फेडरल रिझर्व्हच्या पुढील निर्णयाकडे आता गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी अखेरच्या सत्रात युरोपीय शेअर बाजार अनेक महिन्यांच्या उच्चांकावरून मागे पडले आहे कारण हेवीवेट तंत्रज्ञान आणि वित्तीय शेअर्समधील कमकुवतपणा कमाईच्या अहवालांमधील नफ्यापेक्षा जास्त असल्याने निर्देशांकात नुकसान झाले होते तर गुंतवणूकदारांनीही अमेरिका-रशिया शिखर परिषदेवर बारकाईने लक्ष ठेवले होते.


भारतीय शेअर बाजारांनी सहा आठवड्यांचा तोटा वाढीत बदलला आहे. आणि सुट्टीच्या काळात कमी झालेल्या आठवड्यात जवळजवळ एक गिफ्ट निफ्टीने टक्का वाढ आज नोंदवली आहे. येत्या आठवड्यात, गुंतवणूकदार वाढीच्या गतीचे संकेत मिळविण्यासाठी एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस आणि कंपोझिट पीएमआयसह देशांतर्गत उच्च-फ्रिक्वेन्सी डेटाचा मागोवा घेतील. त्यामुळे आज शेअर बाजारात तेजी दिसली असली तरी गुंतवणूकदारांनी क्षेत्रीय विशेष समभागात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे महत्वकारक ठरू शकते.


याखेरीज शुक्रवारी दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींची भेट झाल्यानंतर अमेरिकेने रशियाच्या तेल निर्यातीत व्यत्यय आणण्यासाठी पुढील उपाययोजना राबवून युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशियावर अधिक दबाव आणला नाही, त्यामुळे आज कच्चे तेलही घसरले आहे. सोन्याच्या बाबतीत विचार केल्यास, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ अजेंडामुळे अमेरिकेत महागाईचा दबाव निर्माण होऊ लागला आहे आणि त्यामुळे दर कपातीचा धोका निर्माण होऊ शकतो, या संकेतांमुळे सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात घसरण झाली होती. त्यामुळे भारतीय बाजारात आजही सोन्यात कि रकोळ घसरण झाली आहे.


रूपयाच्या बाबतीत बघितल्यास गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १० पैशांनी घसरून ८७.५७ वर स्थिरावला होता. कारण आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढत राहिल्याने तो रूपयावर द बावपातळी निर्माण झाली होती. प्रोव्हिजनल आकडेवारीनुसार, गुरुवारी परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FII) १९२७ कोटी रुपयांचे शेअर्स निव्वळ रोख गुंतवणूक विकली असून दरम्यान, घरगुती संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) यांनी ३८९६ कोटी रुपयांची रोख निव्वळ खरेदी केली आहे. मुख्य म्हणजे भारतीय बाजाराच्या दृष्टीने सकारात्मक गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणानंतर बाजारात आश्वासकता निर्माण झाली आहे. दिवाळीपूर्वी संभाव्य दर कपातीसह वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संरचनेत (Structural) बदलांची‌ सुधारणांची घोषणा केली होती ज्यामुळे बाजारासाठी हा बुस्टर डोस ठरू शकतो.


सकाळच्या सत्रात सुरूवातीला सर्वाधिक वाढ हिरो मोटोकॉर्प (७.६४%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (७.१८%), मारुती सुझुकी (७.०५%), ब्लू स्टार (६.७८%), अंबर एंटरप्राईजेस (६.५७%), टीव्हीएस (६.०५%), बजाज फायनान्स (४.९९%), डाबर इंडिया (४.९३%), हवेल्स इंडिया (४.६५%), नेस्ले इंडिया (४.६३%), लेमन ट्री हॉटेल (४.६३%), वोडाफोन आयडिया (३.४१%), न्यू इंडिया ॲशुर न्स (३.३४%), आदित्य बिर्ला फॅशन (३.३२%),बाटा इंडिया (३.२७%), बिकाजी फूडस (३.३०%), हिन्दुस्तान युनिलिव्हर (३.१३%), जनरल इन्शुरन्स (२.९६%), श्रीराम फायनान्स (२.७८%), इंडस इंड बँक (२.७६%), जेएसडब्लू स्टील (२.१५%), टाटा मोटर्स (२.०९%), टाटा स्टील (१.३३%), जिओ फायनांशियल सर्व्हिसेस (१.२४%) समभागात वाढ झाली आहे.


सकाळच्या सत्रातील सुरुवातीला सर्वाधिक घसरण गॉडफ्रे फिलिप्स (४.३१%), कोहान्स लाईफ (२.५९%), बलरामपूर चिनी (२.०९%), सोनाटा सॉफ्टवेअर (२.०४%),एचपीसीएल (१.५७%), वरू ण बेवरेज (१.२३%), भारती हेक्साकॉम (१.०६%), त्रिवेणी इंजिनिअरिंग (०.९६%), पीटीसी इंडस्ट्रीज (०.८८%), गोदावरी पॉवर (०.७८%), सिमेन्स (०.४०%), टोरंट पॉवर (०.३६%), इन्फोसिस(० .०३%) समभागात झाली आहे.


आज सकाळच्या सत्रावर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक अमृता शिंदे म्हणाल्या आहेत की,'भारतीय बेंचमार्क निर्देशां क आज सकारात्मक पातळीवर उघडण्याची अपेक्षा आहे, असे गिफ्ट निफ्टीने दर्शविले आहे, जे निफ्टी ५० मध्ये सुमारे ३१५ अंकांची वाढ दर्शवते. बाजारातील भावना सावधपणे आशावादी राहते परंतु सततच्या अस्थिरता आणि मिश्र जागतिक संकेतांमुळे ते अजूनही भारलेले आहे. मागील सत्रात, निफ्टी दिवसभर सपाट उघडला आणि रेंज-बाउंड व्यवहार करत होता, जे बाजारातील सहभा गींमध्ये अनिर्णय दर्शवते. तांत्रिकदृष्ट्या, २४७५० पातळीवरील निर्णायक हालचाल २४९०० आणि २५,००० पातळीच्या वरच्या दिशेने वाढण्याचा मार्ग मोकळा करू शकते, तर तात्काळ आधार २४ ६०० आणि २४५०० पातळीवर आहे - दोन्ही नवीन दीर्घ पोझिशन्ससाठी आकर्षक क्षेत्र मानले जातात.


त्याचप्रमाणे, बँक निफ्टी देखील सत्रादरम्यान सपाट उघडला आणि ५५०००-५५५०० पातळीच्या अरुंद श्रेणीत एकत्रित झाला. या श्रेणीतून ब्रेकआउट, मजबूत किंमत कृतीमुळे, पुढील दिशात्मक हालचाल निश्चित करण्याची शक्यता आहे. प्रमुख आधार ५५००० आणि ५४९०० पातळीवर आहेत, तर ५५६७०-५६००० झोनमध्ये प्रतिकार दिसून येतो. या प्रतिकार श्रेणीच्या (Resistance Lev el) वर एक खात्रीशीर ब्रेकआउट मानसिक ५६२०० पातळीकडे जाण्याचा मार्ग मोकळा करू शकतो. संस्थात्मक आघाडीवर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) १४ ऑगस्ट रोजी सलग चौथ्या सत्रात त्यांची विक्रीची मालिका सुरू ठेवली. १९२६ कोटी किमतीच्या इक्विटीज ऑफलोड केल्या, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DIIs) निव्वळ खरेदीदार राहिले, ३८९५ कोटी कि मतीच्या इक्विटीज खरेदी केल्या.


पुढे पाहता, 'बाय-ऑन-डिप्स' धोरणाची शिफारस केली जाते, विशेषतः जर निफ्टी २४५०० पातळीच्या खाली घसरला तर. २४३३०-२४५०० श्रेणी ही एक मजबूत खरेदी क्षेत्र म्हणून ओळखली जाते, तर २४९००-२५००० बँडमध्ये प्रतिकार प्रक्षेपित केला जातो. सध्याच्या अस्थिरतेमुळे, व्यापाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा, कडक स्टॉप-लॉस उपायांचा वापर करण्याचा आणि जोखीम प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी रात्रभर लांब पोझिशन्स ठेवण्याचे टाळण्याचा सल्ला दिला जातो.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,' बाजारपेठेसाठी म जबूत टेलविंड्स आहेत आणि ते तेजस्वी होण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत जीएसटीमध्ये पुढील मोठ्या सुधारणांबद्दल पंतप्रधानांनी केलेली घोषणा ही एक मोठी सकारात्मक बाब आहे. बहुतेक वस्तू आणि सेवा ५% आणि १८% कर स्लॅबमध्ये असतील अशी अपेक्षा आहे. सध्या २८% कर स्लॅबमध्ये असलेल्या ऑटो आणि सिमेंट सारख्या क्षेत्रांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. टीव्हीएस मो टर्स, हिरो, आयशर, एम अँड एम आणि मारुती या बातम्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची शक्यता आहे. जीएसटी सुधारणेचा फायदा विमा कंपन्यांनाही होण्याची अपेक्षा आहे. एस अँड पी ५०० ने भारताचे सार्वभौम क्रेडिट रेटिंग अपग्रेड करणे ही आणखी एक मोठी सकारात्मक बाब आहे. परंतु नकारात्मक बातम्यांचा प्रवाह देखील मजबूत असल्याने बाजाराने या घोषणेकडे दुर्लक्ष केले. २ ७ ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी भारत-अमेरिका व्यापार चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. भारतावर ५०% कर लादण्याची 'ट्रम्प तलवार' बाजारातील उत्साहाला आळा घालेल जी आधी नमूद के लेल्या सकारात्मक बातम्यांमुळे चालना मिळू शकते. रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आज झालेल्या बैठकीच्या निकालांवर बाजाराचे बारकाईने लक्ष असेल.'


आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'गेल्या आठवड्यात २४ ६७०-७२० च्या क्षेत्रात उलटण्याचे प्रयत्न थांबले, ज्यामुळे निफ्टीला तेजीची पुष्टी मिळाली नाही. तथापि, मिड आणि स्मॉल कॅप इंडेक्स घटकांपैकी अनुक्रमे ४३% आणि ३९% त्यांच्या संबंधित १० दि वसांच्या एसएमएच्या वर गेले, जे जुलैच्या अखेरीपासूनचे सर्वोच्च आहे, जे सूचित करते की व्यापक बाजारातील उलट आधीच खेळात आहे. हे आम्हाला गेल्या आठवड्यात चर्चा केलेल्या २४८५० २५०००-२५२०० उद्दिष्टांवर टिकून राहण्यास प्रोत्साहित करते. २४८५० एक कठीण आव्हान उभे करेल अशी अपेक्षा आहे, परंतु जोपर्यंत त्याची अस्थिरता २४६५० पातळीच्यावर आहे तोपर्यंत वरच्या आशा कायम राहू शकतात.'


त्यामुळे आज सकाळी शेअर बाजारात तगडी रॅली झाली असली तरी अखेरीस त्यामध्ये अनपेक्षितपणे घसरण होते का रॅलीत घट होईल का बाजार पातळी आणखी वाढेल हे अखेरच्या सत्रात सम जेल मात्र ऑटो, मेटल, एफएमसीजी, फायनांशियल सर्व्हिसेसमध्ये झालेल्या वाढीला घरगुती गुंतवणूकदारांनी साथ दिल्यास प्रतिकाळ पातळी तोडणे एफआयआयला तोडणे शक्य होणार नाही हे निश्चित आहे.

Comments
Add Comment

मुंबईत पावसाची धुमश्चक्री, मेट्रो ठरली तारणहार!

मुंबई: सोमवारी शहरात मुसळधार पाऊस सुरू असताना, ज्यामुळे रस्ते नद्यांसारखे झाले आणि प्रमुख मार्गांवर वाहतूक ठप्प

अल्ट्रा-फास्ट-फॅशन ब्रँड लिबासचा मुंबईत विस्तार

ओबेरॉय स्काय सिटी मॉल, बोरिवली येथे नवीन स्टोअर सुरु केले  मुंबई: लिबास या भारतातील आघाडीच्या अल्ट्रा-फास्ट-फॅशन

विमान प्रवासावर पावसाचा परिणाम!

मुंबई: सलग तिसऱ्या दिवशी, सततच्या पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: पंतप्रधान मोदींना आज शेअर बाजाराकडून गोड प्रतिसाद! मात्र सकाळची तुफानी 'या' कारणाने रोखली सेन्सेक्स व निफ्टी उसळला 'हे' आहे आजचे सविस्तर विश्लेषण

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रातही रॅली कायम राहिली आहे. बाजार बंद होताना

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या

कौन बनेगा करोड़पती १७ : पहिल्या आठवड्यातच मिळाला करोडपती, आता प्रश्न ७ कोटींचा!

मुंबई : अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो कौन बनेगा करोड़पती पुन्हा एकदा सीझन १७ सोबत प्रेक्षकांच्या