Monday, August 18, 2025

कल्याणमध्ये कचराकुंडीजवळ नवजात अर्भक

कल्याणमध्ये कचराकुंडीजवळ नवजात अर्भक

कल्याण : कल्याण पश्चिमेतील बारावे गाव शिवमंदिर रस्त्यालगत नवजात स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळले आहे. मानवतेला कळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यातून माहिती मिळाल्यानंतर रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रशासनाने हे अर्भक ताब्यात घेतले आहे.
या बालकाची प्रकृती स्थिर आहे. हे बालक बालरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल, असे कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. समीर सरवणकर यांनी माध्यमांना सांगितले.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण प. येथील बारावे गाव शिवमंदिर रस्ता परिसरात कचराकुंडी जवळ हे बाळ आढळले.
बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ धावले, ग्रामस्थांनी यासंदर्भात खडकपाडा पोलीसांना माहिती दिली, पोलिसांनी यासंदर्भात मनपा आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता डॉ. समीर सरवणकर यांनी परिचारिका आणि मदतनीस माध्यमातून वसंत व्हाली येथील सुतिका गृहात बाळाला आणित देखरेख सुरू केली असल्याचे प्रसिद्धी माध्यमा़ना सरवणकर यांनी सांगितले. तर पोलिसांनी निर्दयी पालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन विशेष पथके सक्रिय, केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून
प्राप्त झाली आहे.

Comments
Add Comment