फास्टॅग वार्षिक पासला देशभरातून प्रचंड प्रतिसाद, चार दिवसांत तब्बल इतक्या लोकांनी केला बुक


नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नुकत्याच सुरू केलेल्या फास्टॅग वार्षिक पासला देशभरातील वाहनचालकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. १५ ऑगस्टपासून ही योजना सुरू झाली असून, अवघ्या चार दिवसांत ५ लाखांहून अधिक वार्षिक पास बुक किंवा सक्रिय करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.



काय आहे ही योजना?


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केल्यानुसार, वारंवार महामार्गावरून प्रवास करणाऱ्या खासगी वाहनधारकांसाठी ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. या पासमुळे वर्षभरात २०० टोल प्लाझा क्रॉसिंगसाठी केवळ ३,००० रुपये भरावे लागतील. याचा अर्थ एका प्रवासासाठी सरासरी फक्त १५ रुपये खर्च येतो. ज्यामुळे नियमित प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होणार आहे.



मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे:


रक्कम : ३,००० रुपयांच्या एकाच पेमेंटमध्ये वर्षभरासाठी टोलची चिंता मिटेल.


वेळेची बचत: वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्याची गरज नाही. टोल प्लाझावर न थांबता जलद प्रवास शक्य.


आर्थिक बचत: या पासमुळे सुमारे ७,००० रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते, असा सरकारचा दावा आहे.


डिजिटल सुविधा: हा पास 'राजमार्गयात्रा ॲप' किंवा NHAI च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी किंवा सक्रिय करता येतो.


केवळ खासगी वाहनांसाठी: ही योजना फक्त कार, जीप आणि व्हॅनसारख्या खासगी, गैर-व्यावसायिक वाहनांसाठी लागू आहे.


NHAI ने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेमुळे देशभरातील महामार्गांवरील वाहतूक अधिक सुरळीत होईल, टोल प्लाझावरील गर्दी कमी होईल आणि प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर होईल.


Comments
Add Comment

भारत-ओमानची मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा मस्कत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी

IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या

पंतप्रधान येत्या २० आणि २१ डिसेंबरला आसाम दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० आणि २१  डिसेंबरला आसामला भेट देणार आहेत. दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी ३

SIR तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा, ३२०० कोटींचे प्रकल्प सुरू

मुंबई : सध्या पश्चिम बंगालमध्ये SIR मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताला मोठ्या लढाईत गुंतवून ठेवण्याचा डाव ?

कोलकाता : बांगलादेशमध्ये एकीकडे जमिनीवर भारतविरोधी आंदोलनांना धार येत असतानाच, दुसरीकडे समुद्रातही तणाव

ओला-उबरला टक्कर; १ जानेवारीपासून भारत टॅक्सी ॲप सुरू होणार

मुंबई : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, ओला आणि उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवांना पर्याय ठरणारे भारत